शमा उर्दू शाळेत क्रीडा सप्ताहचे उद्घाटन


शमा उर्दू शाळेत क्रीडा सप्ताहचे उद्घाटन





सोलापूर - शमा शिक्षण प्रसारक मंडळ व नजीर मुनशी तौसीफी कमेटी च्या संयुक्त विघमाने
मजरेवाडी येथील शमा उर्दू प्राथमिक शाळेत  आंतर वर्गीय क्रीडा सप्ताहचे आयोजन करण्यात आले. हवेत फुगे सोडून 
उद्‌घाटन नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी यांच्या हस्ते करण्यात आले
या वेळी नजीर मुन्शी गौरव समिती प्रमुख डॉ शफी चोबरार , संस्थेचे सचिव अबुबकर नल्लामंदू ,  उर्दूचे ज्येष्ठ कवी चाँद अकबर , लातूरचे मुस्लीम कबीर ,
शकी कॅप्टन ,सुलतान शेख  यांच्या प्रमुख उपस्थिति होती .
या वेळी नजीर मुन्शी यांनी आयुष्यात खेळाचे महत्व यावर मार्गदर्शन करत म्हणाले - मोबाईल मुळे छोटे - मोठे सर्वांच्या अंगात आळशीपण निर्माण झाल्याने सर्वांचे प्रत्येक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे सर्वत्र दिसत आहे . त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसत आहे
आता या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष न करता व्याम विविध प्रकारचे लहान लहान मनोरंजक खेळाचे आयोजन करावे असे आवाहन केले .
नंतर ज्येष्ठ साहित्यिक अय्युब नल्लामंदू यांनी खेळाचे महत्व सांगणारी कविता सादर करून
बालका मध्ये खेळाविषयी जन जागृती केली
जो दौडे वो पाए बहुत कुछ
जो सोए वो पछताए खूब
इसी लिए
खेलें हम खूब दौंडे हम :!
सदा चुस्त व चालाक रहें हम 
या वेळी इंग्रजी विषयात पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या महिला महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका सौ निकहत पांगा यांच्या विशेष सत्कार गुलबर्गाचे ज्येष्ठ साहितिक  चाँद अकबर यांच्या हस्ते करण्यात आले
क्रिडा प्रमुख अब्दुल कुद्दूस नल्लामंदूनीं सर्व उपस्थितांचे स्वागत करत सत्कार केले , सुत्रसंचलन मजहर अल्लोळी यांनी केले तर आभार आसीया बिजापुरे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments