.राज्य स्तरीय ,दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन ७ जानेवारीला सोलापूर मध्ये
--- - - - - - - - - - - - - - - - - - - -
♦️संमेलनाध्यक्ष डॉ अर्जिनबी युसूफ शेख
♦️ स्वागताध्यक्ष डॉ. सुरैय्या परवीन जहागीरदार
-- - - - - - - - - - - - - - - - -
सोलापूर - अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद , सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा ,ता. कळमनुरी जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक , लेखिका , रेडियो प्रोग्राम कंपीयर असिस्टेंट प्रोफेसर डॉ. सौ .अर्ज़िनबी युसुफ शेख यांची तर स्वागत अध्यक्ष म्हणून एम . ए . पानगल ज्यु महाविधालय सोलापूर येथील उप - प्राचार्या डॉ . सुरैय्या जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव अय्युब नल्लामंदू , ग्रामीण साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी एका पत्राका द्वारे दिली आहे .
भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका , युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंती निमित्त आयोजित या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन विद्रोही साहित्यिका प्रतिभा परदेशी करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ अजीज नदाफ, सोलापूर , प्र . प्राचार्य डॉ शकील शेख , सोलापूर , कवियत्रि अनिसा सिकंदर शेख दौंड, बा ह . मगदूम पुणे , प्रा सय्यद अलाऊदीन बीड , मुस्लीम कबीर लातूर , सायरा बानू चौगुले रत्नागीरी , साबीर सोलापूरी , आनंद घोडके इ उपस्थि राहून मार्गदर्शन करणार आहेत या वेळी पुस्तक प्रकाशन , पुरस्कार वितरण , गजल , ज्येष्ठ कवी मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन आदि कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. हे साहित्य संमेलन डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृह सोशल महाविद्यालय , न्यू बिल्डींग , सैफी हाॅस्पिटलच्या समोर , सिध्देश्वर पेठ , सोलापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने साहित्य प्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मुख्य संयोजक डॉ . इ जा . तांबोळी सचिव अय्युब नल्लामंदू व ग्रामीण साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले आहे
या वेळी सकाळच्या सत्रात अ .भा .मुस्लीम मराठी साहित्य परिषद प्रकाशित व डॉ इ. जा . तांबोळी व अय्युब नल्लामंदू संपादित मराठी प्रातिनिधिक काव्य संग्रह "गुलदस्ता " , इंतेखाब फराश पुणे संपादित "स्पंदन " ही पुस्तक , कवि खाजा भाई बागबान यांचे दोन काव्य संगृह " क्षणभंगूर " व
" पाऊलखुणा इत्यादि पुस्तकांचे प्रकाश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे
दुपारच्या सत्रात कवी संमेलन व तिसऱ्या सत्रात मान्यवारांचे मनोगत व समारोप चा कार्यक्रम होईल .
एक दिवसीय फातीमांबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मुबारक शेख ,हसीब नदाफ , प्र .प्राचार्य डॉ शकील शेख , मजहर अल्लोळी , मलेका शेख तर ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने कवी हाशम ई. पटेल, खाजाभाई बागवान , डाॅ. सय्यद जब्बार पटेल , शेख शफी बोल्डेकर , डाॅ. महंमद रफी शेख , इस्माईल शेख , जाफरसाहाब शेख , महासेन प्रधान प्रयत्नशील आहेत

0 Comments