दिनदर्शिकेला साहित्यपत्रिका दर्जा प्राप्त होत आहे " कासिद " दिनदर्शिकेच्या प्रकाशन समारंभात डॉ तांबोळी यांचे मनोगत

 दिनदर्शिकेला साहित्यपत्रिका दर्जा प्राप्त होत आहे

" कासिद " दिनदर्शिकेच्या प्रकाशन समारंभात डॉ तांबोळी यांचे मनोगत








सोलापूर - आज कॅलेंडर चा महत्व वाढत आहे अनेक वृतपत्र ही कॅलेंडर प्रकाशित करतात आधुनिक काळात आधुनिक पद्धतीने आकर्षित रित्या प्रकाशित होणाऱ्या बहुभाषिक कॅलेंडरने सर्वांच्या मनात एक स्थान प्राप्त केल्याचे दिसत आहे कारण कॅलेंडर आता तारीख  बघण्यापुर्ता मर्यादित राहिले नांही तर कॅलेंडर मध्ये प्रकाशित होणारी इतर अध्यात्मिक , माहिती साहित्यिक लेख विविध शायरी ने त्याला वार्षिक साहित्य पत्रिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे

असे मनोगत प्राचार्य तांबोळी यांनी "कासिद " दिनदर्शिकेचे प्रकाशना वेळी व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून उर्दूचे ज्येष्ठ साहित्यिक चाँद अकबर गुलबर्गा , मुस्लीम कबीर लातुर ,, नूर ट्रस्टचे नजीर मुन्शी , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रा पी पी कुलकर्णी , उर्दू विकास फौंडेशनचे सुल्तान अख्तर , शमा शाळेचे अब्दूल कुद्दूस नल्लामंदू , डॉ शफी चोबदार , खादिमाने उर्दू फोरम चे विकार शेख उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले

अय्युब नल्लामंदू यांनी प्रस्ताविक करत सर्वाचे स्वागत केले अबुबकर नल्लामंदू   यांनी सर्वांचे शाल बुके व पुस्तके देवून सत्कार केले सुत्रसंचलन  मजहर अल्लोळी यांनी केले तर आभार अबरार नल्लामंदू यांनी मानले .

या वेळी विकार शेख , मन्नान शेख , अन्वर कमिशनर , जाफर बांगी , रफीक खान , आरजू राजस्थानी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments