सय्यद हस्सान याचे ऑलिम्पियाड परीक्षेत यश
सोलापूर- सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन गुडगाव आयोजित आंतरराष्ट्रीय इंग्रजी-ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत सोशल उर्दू हायस्कूल इयत्ता आठवीत शिकत असलेला सय्यद हस्सान सय्यद गुफ्रान इनामदार याने शाळेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. याला या स्पर्धेत याने इंटरनॅशनलमध्ये 3745, रिजनलमध्ये 2504 आणि झोनलमध्ये 1820 हे रँक मिळाले असून शाळेमध्ये दुसरा रँक मिळाला आहे.
या संपूर्ण परीक्षेत एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. या यशाबद्दल त्याचे आजोबा माजी उपमुख्याध्यापक सय्यद इरफान व काका सय्यद इम्रान यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
.jpeg)
0 Comments