*आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन*
सोलापूर- सोलापूरचा पहिला उर्दू मासिक "माहनामा नये सितारे नई रोशनी"च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन शहर मध्यचेआमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिन्सिपल डॉ. इब्राहिम नदाफ हे होते.
यावेळी व्यासपीठावर उर्दू विस्तार अधिकारी दौलतबी शेख, नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुंशी म. न पा शिक्षण पर्यवेक्षिका निलोफर सय्यद, ॲड.केशव इंगळे, विस्तार अधिकारी अतहर परवेझ दफेदार, ॲड.मौलाअली शेख, दावल नदाफ, इम्रान जमादार, सौ. हसीनअख्तर जमादार, जावीद काजी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार शिंदे म्हणाल्या की "उर्दू ही सर्व भारतीयांची भाषा आहे. धर्माचे लेबल लावणे चुकीचे आहे. सदर मासिक नये सितारे याला आपली साथ राहील. हा मासिक प्रत्येक विद्यार्थी पालकापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे." उर्दू विस्तार अधिकारी अतहर परवेझ दफेदार यांनी या मासिकाचा स्वागत केले तसेच हा मासिक उर्दू वाल्यांसाठी एक मोठी सौगात आहे, असे म्हणाले व या मासिकाद्वारे मुलांची मोबाईलपासून सुटका होईल अशी आशाही व्यक्त केली.
मासिकाची संपादिका सौ. हसीनअखतर इम्रान जमादार यांनी आपल्या प्रस्तावनात सांगितले की, नये सितारे नयी रोशनी ही एक परिपूर्ण शैक्षणिक मासिक असेल. यातून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असेल. वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी सर्वांचा सहकार्य लाभेल, अशी आमची आशा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. इब्राहिम नदाफ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले "जगातील जवळपास सर्व देशात माणसाला विचारवंत बनवण्यासाठी पुस्तकही एक अनमोल साधन आहे" पुस्तकापेक्षा चांगला मित्र कोणी नसतो मोबाईलच्या ह्या काळात पुस्तकांनी आपले महत्त्व कायम ठेवले आहे. मुलांमध्ये संस्कार विकसित करण्यासाठी पुस्तक एकमेव साधन आजही आहे. आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी घरी किमान तीन मासिक तर असावे. उर्दू ही भाषा खरच माणसाला जोडणारी भाषा आहे आणि उर्दू भाषेचा विकास त्याचे मासिके त्याची वृत्तपत्रे त्याची पुस्तके खरेदी केल्यावरच होऊ शकते. माझी विनंती आहे की सर्वांनी या मासिकाचे खुल्या मनाने स्वागत करूया त्याला प्रोत्साहन देऊया कारण हा सोलापूरचा पहिला एकमेव उर्दू मासिक सुरू होत आहे याला आपली मदत गरजेचे आहे.
यावेळी उर्दू विस्तार अधिकारी दौलतबी शेख, नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुंशी म. न पा शिक्षण पर्यवेक्षिका निलोफर सय्यद, ॲड.केशव इंगळे, ॲड.मौलाअली शेख, दावल नदाफ यांचीही भाषणे झाली. पाहुण्यांचा स्वागत इमरान जमादार यांनी केले.
यावेळी युवा नेता सादिक कुरेशी, आयुब नल्लामंदू , कासिम जमादार, इम्रान लूंजे, शफी कॅप्टन तसेच जिल्ह्यातील उर्दू मराठी शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहमूद नवाज यांनी केले तर आभार जावेद काजी यांनी मानले.
0 Comments