अंजुमने क़दीर शोलापुरी तर्फेपुस्तक प्रकाशन व कवी संमेलनाचे आयोजन

अंजुमने क़दीर शोलापुरी तर्फे
पुस्तक प्रकाशन व कवी संमेलनाचे आयोजन

सोलापूर- अंजुमने क़दीर शोलापुरीच्यावतीने रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायं. ६.०० वा. निर्मलकुमार फडकुले हॉल येथे कवी सिराज शोलापुरी लिखीत काग़ज़ी है पैहरन या पुस्तकाचे प्रकाशन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व प्रसिध्द कवी हामीद इक्बाल सिद्दीक़ी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मलकुमार फडकुले हॉल आयोजित करण्यात आले आहे.  तसेच पुस्तक प्रकाशनानंतर कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शहर मध्यचे आमदार प्रणितीताई शिंदे, बज़्मे ग़ालिबचे अध्यक्ष बशीर परवाज़ व ज्येष्ठ समाजसेवक सुरेश हसापुरे उपस्थित राहणार आहे तसेच खान नोविदुलहक़, फारूख सय्यद, लायकअली काझी, चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, तौफिक हत्तुरे, डॉ. अख्लाक वडवान, आरीफ शेख, रियाज हुंडेकरी, मैनोद्दीन शेख, शौकत पठाण, जुबेर कुरेशी, नजीब शेख, शोएब महागामी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
त्यानंतर कवी संमेलनाचे आयोज करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. अक्रम नकाश भूषविणार आहे तर सुत्रसंचालन साहीर आफताब करणार आहेत.
या कवी संमेलनात प्रसिध्द कवी डॉ. क़ासीम इमाम, इरफान जाफरी, हामीद इक्बाल सिद्दीक़ी, उबेद आजम आजमी, डॉ. क़मर सिद्दीक़ी, नईम फराज़, अलतमश शम्स, डॉ. रज़ी शत्तारी, मीर अफजल मीर, सिराज शोलापुरी, आसिफ इक्बाल, आरज़ू राजस्थानी, अ. शुकूर शअुर, इरफान कारीगर, शफी शत्तारी हे कवी आपले कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे.
सर्व श्रोत्यांनी या पुस्तक प्रकाशन व कवी संमेलनास उपस्थित रहावे, असे आवाहन कन्वहेनर मोईज सिराज अहमद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments