अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी पायाभूत सुविधा अनुदानासाठी 12 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी पायाभूत सुविधा अनुदानासाठी 12 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


लातूर, दि. 6 (प्रतिनिधी ): राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित अथवा विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका तथा नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यासाठी 12 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाच्या 5 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संस्थाचालकांनी 7 ऑक्टोबर, 2015 च्या निर्णयाप्रमाणे विहीत नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात 12 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत, मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. रेड्डी यांनी कळविले आहे.

*****


Post a Comment

0 Comments