- बशीर शेख ’कलमवाला’ 9923715373
-----------------------------------
रमजान महिना आणि इतर 11 महिन्यांतील आपल्या मनाची अवस्था, मनात येणारे विचार, दिवसभरात केली जाणारी कृती पाहिली तर रमजानमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वात अद्भूत बदल झाल्याचे आपल्याला स्वतःच जाणवते. हे का बरं जाणवत असेल याचा खोलवर विचार केल्यास आपल्या मनाच्या रहस्याचे गूढ उलगडल्याशिवाय राहत नाही. हे शोधून काढण्यासाठी आपल्या मदतीला कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांची वचने धावून येतात. तसेच रमजान महिन्यात सैतानालाही कैद केले जाते आणि जन्नतचे दरवाजे उघडले जातात असे हदीस संग्रहात आले आहे. त्यामुळे आपणांस पाहावयास मिळते की, या महिन्यात मस्जिदीमध्ये नमाज अदा करणार्यांची संख्या वाढलेली दिसते. 90 टक्क्याहूंन अधिक मुस्लिम रमजान महिन्याचे रोजे धरतात. नमाज पठणाला प्राधान्य देतात. शिवाय, रोजच्या पाच वेळेसच्या नमाजच्या व्यतिरिक्त तरावीहची अतिरिक्त नमाजही पठण करतात. कुरआन पठणही नित्याचेच महिनाभर करतात. या महिन्यात मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आनंदाचे, प्रेमभावाचे माहोल असते. गुन्हेगारीचे प्रमाणही कमी दिसते. का तर या महिन्यात सैतानाला कैद करून ठेवले जाते. तरी परंतु, कमी संख्येने अथवा क्वचितच का होईना या महिन्यात काही लोकांच्या हातून गुन्हे घडतात. त्यामध्ये एक कारण हे की भौतिकतेच्या अतिरेकातून त्याच्यात निर्माण झालेल्या वाईट सवयी आणि काही दुर्गूण.
या सृष्टी निर्मात्याने त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती मनुष्य जो बुद्धिमान प्राणी आहे. त्याला फक्त निर्माणच करून सोडले नाही तर त्याच्यामधील गुण, अवगुण आणि त्यावर उपायाचे त्याला मार्गदर्शन केले आहे. जो ईश्वरी उपाय अंगीकारतो तो यशस्वी होतो. ऐहिक आणि पारलौकिक जीवनामध्ये आणि रमजानचा महिना त्या सर्व लोकांसाठी पर्वणी आहे जे ईश्वरी मार्गावर चालून आपले कल्याण करून घेऊ इच्छितात.
मित्रानों ! माणसाचे शरीर जसे हवामानातील अपायकारक जीवाणूंच्या संपर्कात आले की आजारी पडते तसेच माणसाचे मन, हृदय ही चुकीच्या संगतीत, चुकीच्या विचारांनी आणि ईश्वरी मार्गापासून दूर गेले की ते आजारी पडते. रमजान महिन्याची मात्रा त्या मनाचे खरे औषध आहे. शिवाय, त्या मनावर अपाय कसे होतात यावरील उपाय कुरआनमध्ये सांगितले आहेत, त्यातील एक अध्याय (सूरह) मी आपल्याला सांगत आहे.
कुरआनमधील अंतिम अध्याय सुरह अन्न्नास यामध्ये त्यावर भाष्य करण्यात आलेले आहे. 1. ’कुलआऊजुबिरब्बीनास’ सांगा, मी शरण मागतो मानवांच्या रबपाशी, 2. ‘मालिकीन्नास’ मानवांच्या बादशाहपाशी, 3. इलाहिन्नास मानवांच्या खर्या ईश्वरापाशी 4. ‘मिनशर्रिलवस्वासील खन्नास’ ”त्या शंकाकुशंकात टाकणार्याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो. 5. ‘अल्लजीयुवसविसू फी सुदूरिन्नास’ जो लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करतो. 6. ‘मिनलजिन्नती वन्नास’ मग तो जिन्नांपैकी असो की मानवांपैकी”
सदर अध्यायात अगोदर प्रार्थना सांगण्यात आली. तदनंतर त्याचे कारण स्पष्ट करण्यात आले.
एक तो ’रब्बीनास’ (रबपाशी) अर्थात ’सर्व मानवांचा पालनकर्ता, मालक, समर्थक, स्वामी, प्रभू असणे.’ दुसरा तो ’मालिकीन्नास’ अर्थात ’सर्व मानवांचा सम्राट, सर्वसत्ताधीश आणि शासक असणे.’ तिसरा तो ’इलाहीन्नास’ अर्थात ’मानवांचा वास्तविक खराखुरा उपास्य असणे.’ येथे ही गोष्ट स्पष्टपणे अवश्य माहीत असली पाहिजे, की ’इलाह’ शब्दाचा प्रयोग कुरआनात दोन अर्थाने करण्यात आला आहे. एक तो ज्याला उपास्य असण्याचा हक्कच पोहोचत नाही, परंतु सर्वसामान्यपणे कृतीने त्याची उपासना केली जात असते. दुसरा ’ज्याला उपास्य असल्याचा अधिकार प्राप्त असतो, वास्तविक उपास्य तोच असतो. मग लोक त्याची उपासना करीत असोत अथवा नसोत.’ अल्लाहसाठी जेथे या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे तो याच दुसर्या अर्थाने करण्यात आला आहे. या तीन गुणवैशिष्ट्यांच्या माध्यमाने शरण मागणे (आश्रय घेणे), याचा अर्थ असा होतो की मी त्या उपास्याचा आश्रय घेतो, त्याची शरण मागतो जो मानवांचा पालनकर्ता, बादशाह आणि उपास्य असल्यामुळे मानवावर सर्वस्वी समस्त अधिकार बाळगतो. जो आपल्या दासांचे संरक्षण करण्यास सर्वस्वी समर्थ आणि सत्ताधीश आहे. तो खरोखर त्या अरिष्टापासून स्वतःला आणि इतर मानवांना वाचविण्यासाठी मी त्याची शरण मागतो. इतकेच नव्हे तर ज्याअर्थी तोच पालनकर्ता, बादशाह आणि उपास्य आहे ज्याची मी शरण मागतो व व ज्याच्याशिवाय इतर कोणीही नाही, जो खरोखरीच मला आश्रय देऊ शकतो.
आयातीमध्ये मूळ ’वसवासिल खन्नास’ शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. ’वसवास’चा अर्थ ’पुन्हा पुन्हा वाईट विचार मनात भरविणारा’ आणि ’वसवसे’चा अर्थ पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने व मार्गानी एखाद्याच्या मनात वाईट विचार घालणे की ज्याच्या मनात असे विचार भरविले जात आहे त्याची त्याला भुरळ पडावी. त्याला असे वाटू नये की दुष्प्रवृत्ती, दुष्ट विचार निर्माण करणारा अनभावितपणे त्याच्या हृदयात एक वाईट गोष्ट निर्माण करीत आहे. ’वसवसे’ शब्दात स्वतःच पुनरावृत्तीचा अर्थ सामावलेला आहे. ज्याप्रमाणे भूकंपात कंपणाच्या हलण्याची उत्तेजनापूर्ण क्रियेची पुनरावृत्ती -(पान 24 वर)
समावलेली आहे. मानव केवळ एकदा बहकविल्यावर बहकत नाहीं, किंबहुना त्याला बहकविण्याचे प्रयत्न पुन्हा पुन्हा करावेे लागतात. म्हणून अशा प्रयत्नांना ’वसवसा’ आणि प्रयत्न करणार्याला ’वस्वास’ (दुष्प्रवृत्ती, दुष्टविचार निर्माण करणारा) म्हणतात, उरला शब्द ’खन्नास’, तर हा शब्द ’खुनूस’पासून आहे, ज्याचा अर्थ ’प्रकट झाल्यानंतर लपणे अथवा आल्यानंतर मागे सरकणे अथवा मागे फिरणे’ असा आहे. ’खन्नास’ ज्याअर्थी अतिशयोक्तीचा शब्द आहे म्हणून याचा अर्थ हे कृत्य पुष्कळ वेळा करणारा असा आहे. आता ही गोष्ट स्पष्ट आहे की ’वसवसा’ घालणार्याला पुन्हा पुन्हा दुष्प्रवृत्ती, दुष्टभावना निर्माण करण्यासाठी परत-परत परतून यावे लागते. एकदा दुष्प्रवृत्ती निर्माण करण्याचे प्रयत्न जेव्हा अपयशी ठरतात, तेव्हा दुसर्या शब्दांत तेच प्रयत्न दुसर्यांदा-तिसर्यांदा करण्यासाठी तो वरचेवर येत असतो.
’वसवासिल-खन्नास’ समजून घेतल्यानंतर या गोष्टीवर विचार केला पाहिजे की त्याच्या वाईट विचाराच्या अपायकारक प्रेरणेपासून शरण मागण्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ शरण मागणारा त्या दुष्प्रवृत्त करणार्या उपद्रवापासून अल्लाहची शरण मागतो की यदाकदाचित त्याने त्याच्या हृदयात दुष्ट विचार उत्पन्न करू नयेत. दुसरा अर्थ हा आहे की अल्लाहच्या मार्गाकडे निमंत्रण देणार्या व आवाहन करणार्याविरुद्ध जो मनुष्य इतर मानवांच्या हृदयात दुष्ट विचार (वसवसा) उत्पन्न करीत हिंडत असतो, त्याच्या उपद्रवापासून सत्य धर्म (इस्लाम) चे निमंत्रण देणारा अल्लाहची शरण मागतो. सत्य धर्माचे आवाहन करणार्याच्या आटोक्यात ही गोष्ट नाही की त्याच्या व्यक्तित्वाविरुद्ध ज्या-ज्या लोकांच्या मनात वाईट विचार (वसवसे) निर्माण केले जातात त्या सर्व लोकांपर्यंत स्वतः पोहोचावे आणि त्यांचा एकेकाचा गैरसमज नाहीसा करावा, हेसुद्धा योग्य नाही की सत्य धर्माचे आवाहन करणे (दावत) सोडून दुष्ट विचार निर्माण केले जात आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या वाईट विचारांचे निराकारण करावे आणि त्यांच्या आरोपाचे उत्तर देऊन त्यांचे खंडन करण्यात मग्न व्हावे. ही गोष्टसुद्धा त्याच्या पदाला साजेशी नाही की त्याचे विरोधक ज्या खालच्या पातळीवर उतरले आहेत, स्वतः ही त्या पातळीवर खाली यावे, म्हणून सर्वश्रेष्ठ अल्लाहने सत्य धर्माचे (इस्लामचे) निमंत्रण देणार्यास मार्गदर्शन केले आहे की, अशा दुष्यप्रवृत्ती निर्माण करणार्यांच्या वाईट विचारापासून ईश्वराची शरण मागत राहा आणि मग निश्चिंतपणे आपल्या धार्मिक निमंत्रणाच्या कामात मग्न व्हा. त्यानंतर त्याच्याशी सामना करणे तुझे काम नव्हे तर ’रब्बीन्नास’, ’मालिकीन्नास’ आणि ’इलाहीन्नास’चे काम हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की ’वसवसा’ दुष्कृत्यांचा, दुष्प्रवृत्तीचा प्रारंभिक बिंदू आहे. तो एका बेसावध, गाफील अथवा रिक्त मस्तिष्काच्या मानवाच्या रिकाम्या डोक्यावर आपला प्रभाव पाडतो. तो पहिल्यांदा त्याच्या मनात वाईट इच्छा उत्पन्न करतो, मग अधिक दुष्प्रवृत्ती, दुष्टभावनांचा त्याच्यामध्ये संचार करवून त्या वाईट इच्छेला, वासनेला, दुष्ट भावनेला वाईट आकांक्षेत परिवर्तित करतो. मग या पुढे जेव्हा दुष्ट भावनेचा (वसवसा) प्रभाव वाढतो, तेव्हा त्याची आकांक्षा, महत्त्वाकांक्षा बनते. ज्याची शेवटची पायरी दुष्कृत्य आहे. म्हणून दुष्प्रवृत्ती निर्माण करणार्याच्या अरिष्टापासून अल्लाहची शरण मागणे याचा अर्थ असा होतो की ’वाईट विचारांची सुरूवात ज्या जागेपासून होते अल्लाहने जागच्या जागीच त्यांना नाहीसे करावे.’ दुसर्या प्रकारे जर पाहिले तर वाईट विचारांचा प्रादुर्भाव करणार्याच्या दुष्कृत्याचा क्रम असा दिसतो,
की पहिल्यांदा ते नास्तिकता, अल्लाहचा इन्कार, बहुदेववाद, भौतिकवाद अथवा अल्लाह व त्याच्या पैगंबराशी द्रोह व अल्लाहचे अनन्यसाधारण उपासक यांच्याशी शत्रुत्वावर त्यांना उत्तेजित करतात. यात यशस्वी झाले नाही आणि मनुष्य अल्लाहच्या धर्मामध्ये दाखलच झाला तर मग त्याला कोणत्या न् कोणत्या अनिष्ट प्रथेत (बिदअत) जी पैगंबर (स.) यांच्या काळात प्रचलित नव्हती त्याचे अनुसरण करण्यास सुचवितात. हेसुद्धा जमले नाही तर पाप, वासनेचे आकर्षण त्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यातसुद्धा अपयशी ठरले तर मग त्यांच्या मनात विचार उत्पन्न करतात की लहानसहान पाप केल्याने काही बिघडत नाही, येथपावेतो की पुष्कळ वेळा लहानसहान पाप करीत राहिल्याने पापाचे फार मोठे ओझे माणसावर लादले जात राहते. यातून ही मनुष्य सुखरूप राहिला तर सरतेशेवटी ते प्रयत्न करतात की मानवाने सत्य धर्म इस्लामला स्वतःपुरता मर्यादित ठेवावा. धर्माचे वर्चस्व स्थापित करण्याची त्याने काळजी वाहू नये. परंतु कोणी मनुष्य जर या चालीवर मात करण्यात यशस्वी ठरला तर सैतान आणि जिन्नात व मानवांची सर्व समुदायपार्टी अशा माणसावर तुटून पडतात त्याविरुद्ध लोकांना उत्तेजित करतात. त्यांच्या भावना भडकवितात त्यावर शिवीगाळ व आरोपांचा वर्षाव करतात. त्याला चोहोबाजूंनी बदनाम व अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. मग सैतान त्या मोमीन पुरुषाचा राग अनावर करण्यासाठी येऊन प्रयत्न करतो आणि त्याचा राग भडकवीत त्याला सांगतो की हे सर्व काही सहन करणे तर इमानवाल्याच्या भित्रेपणाचे लक्षण आहे. उठ आणि हल्ला करणार्याचा चांगलाच खरपूस समाचार घे. हे सैतानाचे शेवटचे अस्त्र आहे तो सत्य धर्माच्या (इस्लामच्या) आवाहनाच्या मार्गात अडथळे निर्माण करणे, त्याची खोटी करणे आणि सत्य धर्माचे आवाहन करणार्याच्या मार्गाला काटेरी बनवून त्याला गुरफटविण्याचा तो प्रयत्न करतो. यातूनही सत्य धर्माचे निमंत्रण देणारा सुरक्षित बाहेर पडला तर सैतान त्याच्यासमोर विवश होतो. हीच ती गोष्ट आहे ज्यासंबंधी पवित्र कुरआनात फर्माविण्यात आले आहे, ‘आणि जर सैतानाकडून तुम्हाला काही उत्तेजना (प्रोत्साहन) वाटले तर अल्लाहची शरण मागा.’ (सूरह-7 अल्आअराफ, आयत-200; सूरह-41 हामीऽऽम अस्सजदा, आयत-36) सांगा, माझ्या पालनकर्त्या! मी सैतानाच्या उत्तेजनापासून, तुझी शरण मागतो. (सूरह-23 अलमुअमिनून-आयत नं. 97)
“जे लोक पापाभिरू (अल्लाहचे भय बाळगणारे) आहेत त्यांची परिस्थिती तर अशी होत असते की कधी सैतानाच्या प्रभावाने कोणताही वाईट विचार त्यांना स्पर्श करून गेला तर ते त्वरित दचकतात आणि मग त्यांना सरळमार्ग स्पष्ट दिसू लागतो.“ (सूरह-7 अल्आअराफ, आयत-201) याच आधारावर जे लोक सैतानाच्या या शेवटच्या अस्त्राने सुखरूप सुरक्षित बाहेर पडले, त्यांच्यासंबंधी सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले आहे, ही वस्तू एखाद्या भाग्यशालीखेरीज इतर कोणाला प्राप्त होत नाही. (सूरह-41 हामीऽऽम अस्सजदा, आयत-35) या संदर्भात एक गोष्ट आणखी नंतर समोर असली पाहिजे ती अशी की मानवाच्या मनात ’वसवसा’ (दुष्प्रवृत्ती) निर्माण करण्याचे कृत्य केवळ बाहेरूनच सैतान आणि जिन्नात करीत नाहीत तर मानवाच्या आंतरिक मनातील सैतानसुद्धा त्याला बहकवित असतो. हीच गोष्ट आहे जी कुरआनात एका जागी फर्माविण्यात आली आहे,
“आणि आम्ही त्याच्या स्वतःच्या मनातून उभारत असलेल्या ’वसवस्यां’ना (वाईट प्रवृत्तींना)
जाणतो.“ (सरह-50 क्राऽऽफ़, आयत-16) याच आधारे पैगंबर (स.) यांनी प्रसिद्ध ’खुतबए-मसनूना’ मध्ये फरमाविले आहे,“आणि आम्ही त्याच्या स्वतःच्या मनातून उभारत असलेल्या ‘’वसवस्यां’ना (वाईट प्रवृत्तींना) जाणतो.” (सुरह-50 काऽऽफ, आयत नं.16).
याच आधारे पैगंबर (स.) यांनी प्रसिद्ध ’खुतबए-मसनूना’मध्ये फर्माविले आहे,‘’ आम्ही अल्लाहची शरण मागतो आपल्या स्वतःच्या मनाच्या खोडसाळपणा व उपद्रवापासून.” (संदर्भः तफहिमुल कुरआन खंड 6- 543-46)
मित्रानों, आपण सदरील कुरआनचे मार्गदर्शन वाचल्यास आपल्या लक्षात येईल की, अल्लाहने मनुष्याला निर्माण करून सोडून दिले नाही तर त्याच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेतली आहे. यामध्ये रमजान महिन्याची मोठी भूमिका आहे. या महिन्यात स्वयंशिस्त, वक्तशीरपणा, आज्ञाधारकता, संयम, त्याग (मानसिक, शारीरिक, आर्थिक) चे प्रात्यक्षिक मिळते. शिवाय, मानसिक आणि शारीरिक एवढा व्यायाम होतो की तो तावून सुलाखून निघून पुढे येणारे 11 महिने सरळ मार्गावर चालण्याच्या काबील बनतो. रमजानच्या सरतेशेवटी ईद उल फित्रच्या रूपाने रोजाधारकांना बक्षीसही मिळते. त्याचा लाभ समस्त मानवजातीला कोणत्या न कोणत्या रूपाने होतो. कुरआन मानवी कल्याणाचा पवित्र ग्रंथ आहे. तो प्रत्येकाने वाचावा त्यामध्ये आपल्या मनाची कैफियत सापडेल आणि आपण सत्य मार्गावर चालणारे बनू शकू. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, मला, तुम्हाला आणि समस्त मानवजातीला सत्यमार्ग मिळो आणि आमचे ऐहिक आणि पारलौकिक जीवन यशस्वी होवो. आमीन.
0 Comments