विशेष संदेश 📙
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
अस्सलामु अलैकुम .. ईद मुबारक
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
लेखक -
अय्यूब अ. लतीफ नल्लामंदू
सचिव: अ . भा मुस्लिम मराठी साहित्य परिषद , सोलापूर
9766819981
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
" शव्वाल " इस्लामी महिन्यातला दहावा महिन , रमजान चा महिना संपल्या नंतर दहावा महिना लागतो शव्वालच्या पहिली ताखेला रमजानईद म्हणजे " इद - उल- फित्र " साजरी करतात इदची सामूहिक नमाज पढल्या नंतर एक दुसऱ्याला " अस्सलामु अलैकुम .... इद मुबारक " म्हणत अलिंग देतात . . . कोणी मुसाफा करत म्हणजे हातात हात मिळवुन
शुभेच्छा देतात
यात एक कॉमन शब्द आहे
" अस्सलामु अलैकुम " हे काय आहे ? ... ह्याचा अर्थ काय आहे?
याचा उत्तर देताना समोरचा व्यक्ती काय म्हणतो ? हे आपण आज ह्या लेख द्वारे समजून घेऊ ....
. . . . . . . . . . .. . . . .
पैगंबर हजरत मुहम्मद (स्व०) नीं आपल्या अनेक हदीस द्वारे "सलाम "
ला मोठे महत्व दिले सलाम पैगंबराची सर्वात लोकप्रिय सुन्नत आहे ज्याचा अख्या जगात या वर अमल होत आहे
पैगंबर हजरत मुहम्मद [ स्व] नीं फर्माविले- " कलाम " से पहले "सलाम " किया करो = तिरमजी०
म्हणजे एकमेकांशी भेट झाल्या वर बोलण्याआधी सलाम करा त्याशिवाय गोष्टी करु नका०
एवढा महत्व आपल्या आयुष्यात "सलाम'' ला पैगंबरानी करुन दिले कारण ही एकमेकां बद्दल सुखी -समाधानी राहण्याची प्रार्थना आहे०
"अस्सलामु अलैकुम" म्हणजे इशवर तुमच्यावर कृपा करावी , तुम्हाला सही-सलामत ठेवो०
एकमेकांना "सलाम " करणे मोठेपणाचे प्रतीक असते जे संकुंचीत वृतीचे असतात या वर ते स्वच्छ मनाने अंमल करत नाही असे अनेकदा दिसून येते.
सलाम केल्यानंतर समोरच्या व्यक्तीनीं सुध्दा त्याचा उत्तर "वाअलैकुम सलाम " म्हणून द्यायचा असते०
म्हणजे अल्लाह तुमच्यावर ही सुख शांती [कायम ] ठेवावे०
एकमेकांना " सलाम _ नमस्ते " केल्याने मनाताला द्ववेश नांही सा होते ,मनातला "इगो - प्रॉब्लम '' ही राहत नांही, सलाम -नमस्ते करण्या मध्ये उशीर करु नये तात्परता दाखवावी, समोरच्या व्यक्ती सलाम- नमस्ते करावा , मी कशाला करु? असे फालतू विचार मनात सुध्दा आणु नये
कारण पैगंबरांसह प्रत्येक धर्मातील प्रत्येक गुरूंनी ''सलाम " " नमस्ते " करण्यात
तात्परता दाखवण्याचे आदेश दिले आहे इतकेच नव्हे तर लहान मुलाना सुध्दा सलाम करावे , जेणे करुन लहान मुलानां चांगल्या कामाची, आदर करण्याची सवय लागेल ०
सलाम केल्यानंतर त्याचा उतर द्यायलाच हवे कारण हे एका प्रकार ची एकमेकां बदल "दुआ '' असते. बाहेर जाताना सुध्दा सलाम करून "खुदा - हाफीज " म्हणत बाहेर पड़ावे आणि घरी आल्यानंतर , ही "सलाम''
करावे ., पैगंबर मुहम्मद [ स्व] नीं एक हदीस मध्ये म्हणतात कि.
कोणाच्या घरी जात असाल तर बाहेरूनच सलाम करावे , तीन वेळा आवाज द्या, आतुन उत्तर येत नसेल तर परत व्हा , आत येण्याची परवानगी शिवाय कोणाचा ही घरी जाऊ नये०
सतत एकमेकांना भेटत चला , "सलाम ", 'नमस्कार " "गुड मॉनिंग '' 'सस्रीयकाल " करत चला , विचारपूस करत चला या मुळे मन प्रसन्न होते.. दुरावा कमी होते
तर...
चला , आज पासून बोलण्या आधी "सलाम'' करण्याची सुरूवात करू या
0 Comments