पहिल्या रमजान अंकाचे पुणे येथे थाटात प्रकाशन संपन्न*रोजा व रमजान ह्या समीकरणा पलीकडे रमजानचे महत्व समजावून सांगणारा इख्लास रमजान विशेषांक - गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी

*पहिल्या रमजान अंकाचे पुणे येथे थाटात प्रकाशन संपन्न*

रोजा व रमजान ह्या समीकरणा पलीकडे रमजानचे महत्व समजावून सांगणारा इख्लास रमजान विशेषांक - गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी



दिनांक ९ मार्च २०२४ रोजी रमजान विशेष अंक इख्लासचे प्रकाशन संपन्न झाले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेद्वारे प्रकाशीत हा पहिला अंक आहे. या अंकाचे संपादक अनिसा सिकंदर शेख , उपसंपादक खाजाभाई बागवान, कार्यकारी संपादक मंडळ सदस्य तहेसीन सय्यद, दिलशाद सय्यद, निलोफर फणिबंद, नसीम जमादार व प्रकाशक इंतेखाब फराश यांच्या प्रयत्नातून साकार झाले.
इख्लास रमजान अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्य गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष ॲड. हाशम इस्माईल पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष इख़्लास अंकाचे सहसंपादक खाजाभाई बागवान, प्रसिद्ध रंगकर्मी सतीश इंदापूरकर, प्रकाशिका ॲड.राजश्री बोर्डीकर,प्रकाशिका पत्रकार रूपाली अवचारे, पुणे जिल्हा अध्यक्ष बा .ह मगदूम, सचिव मेहमूदा शेख, केंद्रीय सहसचिव इख्लास अंकाच्या संपादिका अनिसा शेख, कवयित्री मिनाज शेख,समाज सेवक बिंनधास्त जिंदगीचे अमित चव्हाण , शाहिन अकॅडमीचे बशीर काझी, कार्यकारी संपादक तहेसीन सय्यद, उमाकांत आदमाने हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने इंग्रजी लेखक सलीम शेख यांनी केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत रमजान चे महत्व व विविधतेतून एकता या विषयावर आपापली मते व्यक्त करुन भाईचारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या अंक निर्मिती करणाऱ्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्रफुल्ल कुलकर्णी ह्यांनी आपल्या मनोगतात आजची सामाजिक परिस्थितीवर व समाजात दूषित झालेल्या वातावरणावर भाष्य केले. त्यांची आपल्या मनोगतात म्हटले की अशा अंकाची आज समाजाला गरज आहे कारण इस्लाम धर्माची ओळख जेव्हा मराठीमधून होईल तेव्हा लोकांना कळेल खरी गोष्ट काय आहे. त्यावर विचार मंथन होईल. समाजातील बांधिलकी वाढण्यास मदत होईल. ह्या अंकात रमजान विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रोजा व रमजान ह्या समीकरणा पुढील रमजानची माहिती मराठी मधून मिळण्यास मदत होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले.सोशल कॉलेजचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, कासिदचे संपादक अय्युब नल्लामंदू, संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, पानगलच्या प्राचार्य डॉ. सुरैय्या जहागीरदार यांच्या ह्या कार्यक्रमासाठी शब्द रुपी विशेष शुभेच्छा लाभल्या आहेत.मुख्य कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंग्रजी लेखक सलीम शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेरी स्कूलचे मुख्याध्यापिका परविन फराश यांनी केले. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी पुणे जिल्हाशाखेने पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments