के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूरच्यावतीने १४ एप्रिलला एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूरच्यावतीने 
१४ एप्रिलला एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

सोलापूर- के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूर व सोलापूर जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४/०४/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत के.एम.सी. गार्डन, सोशल हायस्कूलसमोर, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर येथे "प्रथम एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
सदर एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीरामध्ये उमराह कसे करावे, अहराम कसे बांधावे, तवाफ कसे करावे, रमल कसे करावे, इस्तबा कसे करो, सफा-मरवाहची सही कशी करावी, हजची नियत कशी करावी, मिना, अरफात, मुजदलीफामध्ये काय करावे, रमी जमरात कशी करावी, कुर्बानी कुठे करावी, हलक कसे करावे अशा सखोल धार्मिक विधींचे प्रशिक्षण व प्रात्यक्षीक हज तज्ञ मार्गदर्शक हाजी उस्मान जमादार सर व त्यांच्या सहकार्यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
तरी सोलापूर शहर व जिल्हयातील तमाम हज यात्रेला जाणारे हज यात्रेकरूंनी सदरहू प्रशिक्षणसाठी वेळेवर उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूरचे अध्यक्ष मुबीन सय्यद  यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या भ्रमध्वनीवर संपर्क करता येते.  मुबीन सय्यद (९४०३७२००००), आरीफ शेख (९४२२४५७८६२), उस्मान जमादार सर (९९६०५३९८५५), हाजी अल्ताफ सिद्दीकी (९४२१०२२१३३), जुबेर कुरेशी (९०९६५०५५५५), शकील मौलावी (९१३०१६७६६७), शफीक रचभरे (९९६०००९९८०) संपर्क करता येईल.

Post a Comment

0 Comments