गुढीपाडव्याला सोलापूर जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन
_महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो_
धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेचे रणशींग फुंकले असून निकराचा राजकीय संघर्ष करायची तयारी केली असल्याने निंबाळकरांचा मार्ग खडतर झाल्याचे मानले जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट मीळाल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात बंडाचे निशाण उभारले असून तुतारी हाती घेण्याची तयारी केली आहे. परिणामी रणजितसिंह निंबाळकरांसाठी माढ्याची लढाई निकराची ठरणार असून या घमासानीत कोण मैदान मारणार हे काळच ठरवणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. गेली काही दिवस ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. धैर्यशील मोहित पाटील यांनी 'सिल्व्हर ओक'वर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली अशी ही चर्चा होत आहे. येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी मोहिते पाटील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे समजते आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबीयही माढा मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. सुरुवातीला त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. मतदारसंघातील कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आणि मतदारांचा कानोसा घेतला. त्यावेळी समर्थकांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली. भाजपकडून खासदार रणजितसिंह सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे व धैर्यशील मोहिते पाटील हे एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे समजते. त्यावेळी जेष्ठ नेते शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे.
नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामाराजे निंबाळकर यांचा विरोध होता. दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती.
भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. तरीही भाजप पक्षासाठी जे अनपेक्षित होतं तेच घडत असल्याचे चित्र दिसत आहे.
0 Comments