अर्श मो. गौस पटेल हिचा रमजानचा पहिला उपवास

*अर्श मो. गौस पटेल हिचा रमजानचा पहिला उपवास*



सोलापूर- इस्लाम धर्मांतील पवित्र आणि संयम, प्रेम, शांततेचे प्रतीक असणाऱ्या रमजान महिन्याची सुरुवात झाली असून येथील अर्श मो. गौस पटेल (वय 8 वर्ष) याने पहिला रोजा पूर्ण केला. रमजानमध्ये तब्बल महिनाभर कडक उपवास केले जातात. ऐन उन्हाळ्यात यंदा रमजानचे उपवास सुरू झाले असले तरी घरातील मोठ्यापासून ते बालगोपाल यांच्यामध्ये उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. अर्श पटेल हे सोलापूर सोशल प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहेत. पहाटे अजानच्या अगोदर सहेरी करून दिवसभर अन्न-पाणी न घेता सायंकाळी अजान झाल्यानंतर उपवास सोडला जातो. कमी वयात पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर त्याचा परिवाराकडून हार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याने उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments