रमज़ान ईद पूर्वी जामा मस्जीद ते लातूर वेस पर्यंत रस्ता दोन्ही बाजुने नाली करा

 जामा मस्जीद ते लातूर वेस पर्यंत दोन्ही बाजुने रस्ता रमजान ईद मिरवणुकीद्वारे याच रस्त्याने शहरातील मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी इदगाह मैदान ला जाणारा रस्ता असून या करीता न.प. मार्फत दोन्ही बाजुचे नालीचे बांधकाम अति तात्काळ करुन द्यावे ईद पूर्वी करा :सय्यद मुजफ्फर अली ईनामदार 










औसा (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे की, औसा शहरातील रस्ता रुंदीकरणाचा काम बऱ्याच दिवसापासुन रखडलेले काम सुरु करण्यात आले आहे व दुकानदाराने न.प. च्या आदेशानुसार जागा संपादीत केलेली जागा रिकामी केली आहे.

तसेच मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने शेड, ओठे रिकामे केले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुचे नाली बुजली आहे. असल्यामुळे नालीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे जनतेस घाण पाण्यातून ये जा करावे लागत आहे. सद्या सणासुदिचे दिवस असून मुख्य मार्केट बाहेरुन येणाऱ्या जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही आपले व्यवसाय करण्यास त्रास होत आहे. तसेच ११ व १२ तारखेला मुस्लीम बांधवांचे पवित्र सण रमजान ईद मिरवणुकीद्वारे याच रस्त्याने शहरातील मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी इदगाह मैदान ला जाणारा रस्ता असून या करीता न.प. मार्फत दोन्ही बाजुचे नालीचे बांधकाम करुन द्यावे तसेच शहरात स्ट्रीट लाईट व शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच शहरातील गटारी स्वच्छ करण्यात यावेत अशी मागणी 

सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा यांनी मुख्याधिकारी न प औसा कडे केली आहे 

Post a Comment

0 Comments