सोलापूर- लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिक व बालभारती विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लायन शब्बीर शेख, प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सोलापूर सुधीर खिरडकर, शिक्षण विस्तार अधिकारी रतिलाल भुसे, त्वचारोग तज्ञ सोलापूर सौ. श्रुती मठ, लायन नंदिनी जाधव, लायन आसिफ इक्बाल, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अख्तरबानो शेख, लायन जुबेर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लबच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर शिक्षण विस्तार अधिकारी श्री रतिलाल भुसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र पोलीस आसिफ तारानाईक, श्री इरफान लालसंगी (पोलीस ट्रेनिंग कॅम्प शेगाव), सौ उजमा परवीन कलबुर्गी (लिटल फ्लॉवर), सौ जस्मिन अश्फाक शेख (संधी बालभारती विद्यालय), फरहीन मकबूल मुल्ला (जि प प्राथमिक शाळा), सालेहा बानो रियाज अहमद शेख (दि प्रोग्रेसिव उर्दू हायस्कूल), लुबना इब्राहिम शहापुरे (एम ए पानगल अँग्लो उर्दू), शबाना मेहबूब नदाफ (जि प उर्दू स्कूल विडी घरकुल), आफरीन सोहेल दिंडोरे (एम एन पी बॉईज उर्दू स्कूल), रंजना माणिक काटकर (जि प स्कूल), नसरीन बानू ताजुद्दीन माशाळकर (एम एन पी मुलींची शाळा), रंगरेज मॅडम (वालचंद कॉलेज), तैसिन पीरअहमद सय्यद (धर्मन्ना सादूल प्रशाला), अझरोद्दीन युनूस शेख (बालभारती प्राथमिक विद्यालय), अभिनंदन विभुते (महावीर हायस्कूल), खाजा मैनुद्दीन अलीशेर जेटपूल (वस्तानवी उर्दू जूनियर कॉलेज), सागर लोंढे (प्रणिती शिंदे प्रशाला सोलापूर) या आदर्श व्यक्तिमत्त्वांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ मेळकुंदे मॅडम तर आभार श्री रिजवान शेख सर यांनी मानले.
0 Comments