बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील जवळा हायस्कूल जवळा येथे कर्तव्यरत असलेले कारकून शेख मंजूर यांची कामखेडा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.
शेख मंजूर हे शाळेत कर्तव्य बजावतानाच अनेक सामाजिक कार्यक्रम राबवतात. आजही त्यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची कामखेडा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा ह्रदयी सत्कार करण्यात आला. यावेळी आमीर पटेल सरपंच कामखेडा, बाबुभाई, निजाम सर, शिंदे सर, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेख एजाज़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments