*शेख अंजुम नेहा इकबाल यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड–२०२६’ प्रदान.*
*शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल*
*औसा (प्रतिनिधी)-* मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन,लातूर शाखेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या ‘बेस्ट टीचर अवॉर्ड–२०२६’ पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील एकूण ७० उत्कृष्ट शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल,औसा येथील मुख्याध्यापिका शेख अंजुम नेहा इकबाल यांचाही समावेश आहे.शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल शेख अंजुम नेहा इकबाल यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणासोबत संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रविवार,२७ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड–२०२६’ने गौरविण्यात आले.या पुरस्कार प्रदान सोहळ्यास मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सलीम सारंग,सिनेअभिनेते मा.अनिल मोरे,ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी सिनेट सदस्य मा.प्रा. गोविंदराव घार,पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दाडगे डी. बी.,मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान,लातूर शहराध्यक्ष सलीम अळंद सर, महिला शहराध्यक्ष सय्यदा अजमेरी,मा.प्रा.रिजवान खान, मा.फराह नाज,समाजसेविका हैद्राबाद,नगरसेविका तब्बसूम शेख,पत्रकार अब्दुल समद शेख तसेच सय्यद सलीमुद्दीन सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेख अंजुम नेहा इकबाल या शिक्षण क्षेत्रात मागील 15 वर्षापासून कार्यरत असून,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार,शिस्त,नैतिक मूल्ये,आत्मविश्वास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यावर विशेष भर देतात.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण मिळावे तसेच त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजावेत,यासाठी त्या विविध शैक्षणिक कार्यात सातत्याने योगदान देत आहेत.त्यांच्या या सन्मानामुळे ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल औसा परिवाराच्या शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून,मुख्याध्यापिका शेख अंजुम नेहा इकबाल यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष शेख रसूलसाब गुरुजी,सहसचिव शेख फकीरपाशा साब,म.मुस्लिम कबीर सर, सर्व पालक,शिक्षक,विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 Comments