सोलापूर- महापारेषण कंपनी (MSETCL) येथे कार्यरत असलेले सहायक अभियंता इरफान इसाक मुजावर यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून विद्युत अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा संशोधन विषय 'रिॲक्टीव्ह पॉवर कम्पेन्सेशन ईन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम युजींग फॅक्टस कंट्रोलर्स' या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना इंजिनीअरिंग कॉलेज कराड येथील शिक्षक डॉ. ए. एम. मुल्ला, प्रा. डॉ. दौलतराव आहेर यांचा मार्गदर्शन लाभले.
इरफान मुजावर यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून बी.ई. (इलेक्ट्रिकल) आणि एम.टेक. (इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम) पदवी प्राप्त केली आहे. एम.टेक. अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
त्यांच्या या संशोधनातून वितरण प्रणालीतील ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ, ऊर्जेचे नुकसान कमी करणे, व्होल्टेज प्रोफाइल सुधारणा इ. यासारखे महत्त्वाचे बदल घडू शकतात. याचे फायदे विशेषतः शेतकऱ्यांना मिळू शकतात, जे वितरण कंपनीकडून मिळणाऱ्या वीजेवर अवलंबून असतात. वितरण कंपनीलाही ऊर्जा बचतीच्या संधी मिळू शकतात. श्री. मुजावर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments