शेख बी जी.
औसा.दि.२५ विजयकुमार घाडगे पाटील मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. सोयाबीनला साडेआठ हजार रुपयांचा भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत.यास पाठिंबा म्हणून औसा शहरासह जिल्ह्यातील सर्व संघटनांनी व शेतकरी बांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी औसा मोड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.छावा संघटने सह संभाजी सेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित आंदोलनकारी यांच्याकडून यावेळी टायर जाळून महायुतीचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांच्या सतरकतेमुळे तो थांबला. काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.महायुतीच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
वेगवेगळ्या पक्षांनी च्या नेत्यांची यावेळी भाषणे झाली. राजीव कसबे यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एक तास चालू असलेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी निर्माण झाली होती. पोलिसांचा बंदोबस्त ही यावेळी चोख होता. या रस्ता रोको मुळे अनेकांना त्रास झाला परंतु शेतकऱ्यांसाठी होत असलेल्या या आंदोलनास सर्वांचा पाठिंबा असल्याचे उपस्थित नागरिकात बोलले जात होते. शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचे स्वरूप तीव्र केले जाईल असे सांगितले गेले.
0 Comments