उर्दू साहित्यकारांनी राष्ट्रवाद मजबूत केले - सरफराज शेख यांचे मत साहित्याच्या माध्यमातून नकारात्मक लिखाणाचे उत्तर देत चला - अय्यूब नल्लामंदू

 उर्दू साहित्यकारांनी राष्ट्रवाद मजबूत केले

- सरफराज शेख यांचे मत

साहित्याच्या माध्यमातून नकारात्मक लिखाणाचे उत्तर देत चला - अय्यूब नल्लामंदू






सोलापूर - इदार ए इस्लामी हिंद व सोशल महाविद्यालच्या वतीने आयोजित बहुभाषिक साहित्य चर्चाचे  सत्र पत्रकार समिक्षक  सरफराज शेख यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदचे सचिव  अय्युब नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला .या चर्चा सत्रात  डॉ राजेंद्र वडजे , डॉ देविदास गायकवाड , डॉ भगवान आदटराव , प्रा सुभाष शास्त्री यांनी आपल्या विचार व्यक्त करत साहित्याच्या विविध पहलू वर चर्चा करून साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे भाषा कोणती ही असो ते समाज जोडण्याचे महत्वाचे काम करत असते म्हणून या वर अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले

प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसत असते ते प्रतिबिंध स्वच्छ दिसले पाहिजे साहित्यकाराचा लिखाण हे ऐतेहासिक समजला जातो . म्हणून लिहिताना कोणाचे भावना दुखविण्याचे पाप करू नका .आणि जे कोणी नकारात्यक लिखाण करत असेल तर त्याचा प्रेमपूर्वक उत्तर देण्याची आज गरज आहे प्रेम पूर्वक दिलेल्या उत्तराने गैर समज दूर होतात . आणि आपला अस्त्तिव टिकुन राहतो असे मत व्यक्त केले


कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार सरफराज शेख यांनी इतिहासाचे अनेक संदर्भ देत म्हणाले - इंग्रजीनी आपल्या देशात "तोडो फोडो " नीतीचा वापर करून देशाची एकात्मतेला मलीन केले हे सर्व जग जाहीर आहे . आज प्रयेक धर्माला एकतेची गरज आहे ,सर सय्यद अहमद खां व इतर उर्दू साहित्यकारांनी देशात एकात्मता निर्माण करत राष्ट्रवाद मजबूत केले आहे हे विसरता येत नाही . भाषा टिकली पाहिजे . भाषा संपली की  सांस्कृती संपते

आणि संस्कृती संपली तर आपण कोण ? आपला अस्तिव काय ? असा प्रश्न निर्माण होतो म्हणून भाषेचे जतन करणे जरूरी आहे . असे विचार मांडले .


प्रा डॉ . शफी चोबदार , शफीक काजी यांनी पाहुण्याचे स्वागत केले सुत्र संचलन व आभार प्रा. रईसा मिर्जा यांनी केले .

या वेळी डॉ सलीम खान , डॉ मकबूल अहमद , डॉ इसमाईल शेख , शफीक काजी , इक्बाल 

बागबान , वायज सय्यद , मन्नान शेख , नजीर मुन्शी , महेमूद नवाज , हसीब नदाफ , बशीर परवाज , असरार नल्लामंदू , सरदार नदाफ , म हुसेन बक्षी

उपस्थित होते



Post a Comment

0 Comments