सय्यद मुहम्मद सईद फ़ज़ले मुबीन यांचा पहीला रोजा पूर्ण..

सय्यद मुहम्मद सईद फ़ज़ले मुबीन यांचा पहीला रोजा पूर्ण..




औसा शहरातील सय्यद 
मुहम्मद सईद फ़ज़ले मुबीन 08वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा त्याच्या जीवनातील पहिला रोजा आज दि.09मार्च रोजी पूर्ण केलाय. पहाटे पाच  वाजेच्या सुमारास रोजा ठेवला व संध्याकाळी सहा वाजून 40  मिनिटांनी (उपवास) रोजा सोडला.वय 08 वर्ष हे
रखरखत्या ऊन्हात काहीही न खाता व पाणी ही न पीता १३ तासाचा रोजा (उपवास) रमजान उल मुबारकमध्ये पूर्ण केल्या बद्दल  परिवारात व तसेच परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिलेत.अल्लाह या चिमुकल्यांची  मनोबल वाढवो आणि त्यांचे उपवास स्वीकारो, आमीन.

Post a Comment

0 Comments