औश्यात "स्मार्ट मीटर" ला तीव्र विरोध.
कंपनीचे कर्मचारी भीती दाखवून बसवु लागले स्मार्ट मीटर.
औसा. तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीची कर्मचारी सर्वत्र फिरून स्मार्ट मीटर बसवत आहेत अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना विरोध दर्शवला जात आहे. तरीही हे कर्मचारी ग्राहकांना दंड लागेल अशी भीती दाखवून स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात ग्राहकास भीती दाखवत आहेत. या भीतीपोटी अनेकांनी स्मार्ट मीटर बसवले आहे.
ग्राहकाच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसवता येत नाही. तरीही कर्मचारी जबरदस्तीने अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
स्मार्ट मीटर संदर्भात सद्यस्थितीत ग्राहकात भीतीचे वातावरण आहे. अनेक जण या मीटर मध्ये बिल जास्त येत असल्याची चर्चा करत आहेत.
याबाबतीत आमचे प्रतिनिधी ग्राहकांशी विचारपूस केली त्यावेळी त्यांनी आम्हाला हे मीटर बसवायचे नाहीत असे स्पष्टपणे सांगितले.
"माझे विद्यमान मीटर व्यवस्थित आहे मला या मीटर संदर्भात कसलीही तक्रार नाही तरीही कंपनीचे लोक स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात जबरदस्ती करत आहेत हे चुकीचे आहे" अतिक बागवान.बरकत नगर औसा
शहरात सध्या या मीटर संदर्भात उलट सुलट चर्चा असली तरी या मीटरचा अनेकांनी विरोध दर्शवल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.



0 Comments