पाऊस कांही थांबेना" औसा शहरात अनेकांची पडली घरे तर घरात घुसले पाणी. जीवनावश्यक वस्तुंची नासधुस.

 पाऊस कांही थांबेना"


औसा शहरात अनेकांची पडली घरे तर घरात घुसले पाणी.


जीवनावश्यक वस्तुंची नासधुस.





औसा. तालुक्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसात जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अनेकांची घरी पडली आहेत तर अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे.सलग दोन आठवड्यापासून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही या पावसाने सर्वसामान्यांची तारांबळा उडाली आहे.यात अनेकांची  घरे पडली आहेत तर नवीन वस्तीमध्ये असणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी घुसले असल्याचे चित्र आहे.

पावसामुळे शहरातील 

👉१)मोमीन गल्ली येथील जाफर हावरे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले.२)पठाण वाडा औसा येथे असद पठाण यांच्या घराची भिंत कोसळली आहे. ३)इंदिरा नगर येथील हिमायत इनामदार यांच्या घराची भिंत कोसळली. 

शहरातील हद्दवाढ भागात सारोळा रोड,के के नगर येथील सय्यद अन्वर गौस यांच्या घरात पाणी बसून जीवनावश्यक वस्तूची नासधुस झाली आहे.या कुटुंबाने रात्रभर जागून काढली.याबरोबरच अनेक लोकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील इतर भागातही घरात पाणी शिरून नागरीकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.या झालेल्या नुकसानाची पंचनामे करून या आपत्ती ग्रस्त नागरीकांना अपत्ती व्यवस्थापन निधीतून त्वरीत प्रति कुटुंब पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

पावसात घरात पाणी गेल्याचे पाहून अनेजण मदतीसाठी धावले.यात माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व त्यांचे कार्यकर्ते यांनी आपत्ती व्यवस्थापन यांच्या कुचकामी कामाचा यावेळी समाचार घेतला.

👉 कोणत्या वस्तीत घुसले पाणी. करीमनगर,बरकत नगर,के के नगर, हाश्मी नगर,जी एम नगर, पठाण नगर, सिल्व्हर सिटी,नबी नगर अन्सार नगर काझी गल्ली, मोमीन गल्ली आदी वस्ती मध्ये पाणी आले होते.

👉पंचनामा कोणी केला?

येथील समाजीक कार्यकर्ते यांनी तहसीलदार व पालिका यांना विनंती करुन पंचनामे करायल लावले.तहसीलदार यांनी तलाठी व नगरपालिकेच्या बांधकाम अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.


👉 "रात्रीच्या पावसात अन्वर सय्यद यांच्या घरात पाणी घुसल्याचे कळताच ताबडतोब जीसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचलो होतो पाण्याला वाट करून दिल्यानंतर कांही अंशी पाणी कमी झाले मात्र खाण्यापिण्याच्या वस्तू सर्व खराब झाल्या होत्या.मन हेलावणारे चित्र पाहुन मन दुःखी झालेआहे."





अजहर हाश्मी.औसा  शहराध्यक्ष काँग्रेस.

👉मतदतीचा हाथ - डॉ अफसर शेख माजी नगराध्यक्ष,अजहर हाश्मी शहराध्यक्ष शहराध्यक्ष औसा.
 खुनमीर मुल्ला,उमर पंजेशा,सादीक खोजन,खाजा शेख,मेहराज शेख आदींनी मदतकार्य केले. भरला आहे. 


👉सतर्क रहा.-औसा शहरातील जुन्या गावात सांडवा मधून जोरात पाणी वाहत आहे नागरिकांनी काळजी घावी.खास करून काझी गल्ली, मोमिन गल्ली,  व पुढील भागातील नागरिकांनी. खुनमीर मुल्ला .

Post a Comment

0 Comments