*शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक .16 मोटारी व रोख रक्कम जप्त.*
लातूर याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीमधील पाणबुडी मोटारी चोरीला जात असल्याच्या घटना मागील काही दिवसापासून घडत होत्या.
शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत होते. तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सुद्धा होत होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून चोरीला गेलेली वेगवेगळी शेती अवजारे संदर्भातील गुन्ह्यांच्या छडा लावण्याचे मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीला गेलेल्या,पोलीस ठाणेला दाखल असलेल्या गुन्ह्यांचा डेटा एकत्र करून त्याच्या सखोल विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून शेतातील पाणबुडी मोटार चोरणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान दिनांक 17 सप्टेंबर रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पाणबुडी चोरीतील संशयित गुन्हेगारांना मुरुड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचे नाव
1) कुंदन गजेंद्र काळे, वय 27 वर्ष, राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव.
2) शुभम दशरथ बनसोडे, वय 20 वर्ष, राहणार मंगरूळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव.
असे असून त्यांनी त्याच्या इतर साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतामधून पाणबुडी मोटारी चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडे अधिक तपास करता नमूद आरोपींनी चोरी केलेल्या पाणबुडी मोटारी ह्या बोरगाव ते शिराळा जाणाऱ्या रोडवरील एका बारच्या जवळील कचरा फेकण्यात येणाऱ्या ठिकाणी खड्डा करून पुरून ठेवले होते त्या 16 पाणबुडी मोटारी तसेच काही पाणबुडी मोटारी विकून मिळवलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या पाणबुडी मोटारी वरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण, रेनापुर, मुरुड, औसा, गातेगाव, भादा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील एकूण 16 पाणबुडी मोटारी तसेच रोख रक्कम असा एकूण दोन लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाणबुडी मोटारीचे 08 गुन्हे उघड झाले आहेत.
नमूद आरोपी आरोपींना पुढील तपास कामी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून सदरच्या आरोपीकडून पाणबुडी मोटारी तसेच शेती अवजार चोरीचे आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा पथकाकडून शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.
जप्त केलेल्या पाणबुडी मोटारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात येणार आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुराब पठाण, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे, नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, गणेश साठे, महादेव शिंदे, गोविंद भोसले, जांभळे शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

0 Comments