अपयश पचवता येणारी माणसे जीवनात यशस्वी होतात .डॉ विठ्ठल लहाने
लातूर: श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात प्लास्टिक सर्जरी डॉ.विठ्ठल लहाने , संजय राजोळे, संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, संचालिका सौ.माधुरी बावगे, प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि महाविद्यालयाच्या भौतिक सुविधेबद्दल सविस्तर असे माहिती सांगितली. संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले."डॉक्टरचे डॉक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट आहेत ,माझ्या गरजेचे ब्रँच म्हणजे फिजिओथेरपी. विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना यशाचा पासवर्ड मध्ये चार सूत्र वापरून जीवनाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी वचनबद्धता, सातत्य आत्मविश्वास आणि चांगले संबंध या चार सूत्राचा जीवनामध्ये वापर करून आई वडिलांचे स्वप्न साकार करावे, अपयश पचवता येणारी माणसे जीवनात यशस्वी होतात, अपयश मिळाल्यानंतर खचून जायचं नसतं" असे प्रतिपादन डॉ विठ्ठल लहाने यांनी केले. जागतिक फिजिओथेरपी दिनाचे यावर्षीचे ब्रीद वाक्य ' हेल्दी एजिंग' म्हणजे सुदृढ आरोग्य अशी घोषणा केली. फिजिओथेरपी दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम , द्वितीय व तृतीय येणारे विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित डॉ.पल्लवी तायडे, डॉ. श्रद्धा नागमोडी ,डॉ.शारदा धाडे डॉ.गायत्री बटकुलवार आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनुष्का राऊत व कु.निशाद सय्यद तर आभार डॉ. अखिलेश बिवलकर यांनी मानले.


0 Comments