*मर्कजी तालीमी बोर्ड आणि IISER यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय गणित-विज्ञान कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*
पुणे (प्रतिनिधी):
मर्कजी तालीमी बोर्ड महाराष्ट्र यांच्या वतीने आणि IISER (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च) यांच्या सहकार्याने तीन दिवसीय “गणित व विज्ञान कार्यशाळा” इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर, कोंडवा येथे यशस्वीरित्या पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन मंडळाचे सचिव सय्यद तन्वीर, मार्गदर्शक मौलाना इलियास फलाही, अध्यक्ष अज़ीज़ मुहीउद्दीन, पुणे शहर आयोजक तजम्मुल आणि iRiSE टीम यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी वक्त्यांनी शिक्षकांना आधुनिक वैज्ञानिक अध्यापन पद्धतीशी सुसज्ज करण्यावर भर दिला.
महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतून ६५ शिक्षकांनी (४० पुरुष व २५ महिला) या कार्यशाळेत सहभाग घेतला. अनुभवी Resource Persons नी गणित-विज्ञानातील आधुनिक संकल्पना, प्रोजेक्ट आधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण दिले.
शेवटच्या दिवशी शिक्षकांना IISER च्या फील्ड ट्रिपवर नेण्यात आले, जिथे प्रयोगशाळा भेटी व लाईव्ह डेमोद्वारे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यशाळेतील शिक्षकांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीच्या शिफारसीवरून “Best Participant Award” मोहम्मद कासिम मोहम्मद हनीफ (जामिअतुल हुदा, मालेगाव) आणि शेख उसामा अब्दुल अज़ीज़ (पुणे कॉलेज) यांना प्रदान करण्यात आला.
या यशस्वी कार्यशाळेत जमील सर (इक़्रा बॉईज स्कूल, औरंगाबाद), सुहास सर (जालना), राजा पाटील सर (नांदेड), जाहिदा शेख आणि पल्लवी मॅडम (IISER, तांत्रिक अधिकारी) यांचे मोलाचे योगदान लाभले.
शैक्षणिक क्षेत्रात मर्कजी तालीमी बोर्डाचा हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून, तो शिक्षकांना आधुनिक वैज्ञानिक अध्यापनाशी जोडण्याचे काम करेल.


0 Comments