महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता, आज सकाळी लातूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे जाऊन श्री दिगंबर पवार यांच्या शेतातील खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी  लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता, आज सकाळी लातूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे जाऊन श्री दिगंबर पवार यांच्या शेतातील खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 





लातूर जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातच, सततची अतिवृष्टी, नदी नाल्यांना आलेला पूर यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, विज पडून आणि पुरात वाहून जाऊन मोठी प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे, मोठ्या प्रमाणात पशुधन, शेती अवजारे वाहून गेले आहेत, नदीकाठच्या जमिनी पिकासहित खरडून गेले आहेत. फक्त खरीप पिकेच नाही तर बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे, अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना यावेळी दिली, शेतकऱ्यांबरोबरच, सर्वसामान्य कुटुंबातील इतर घटकही संकटात सापडले आहेत, या सर्व आपदग्रस्त घटकांना शासनाकडून योग्य मदत  मिळणे आवश्यक असल्याचे सांगून आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी विनंतीही  केली.  


अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात  खासदार मा. श्री.

संजयजी राऊत, माजी खासदार मा. श्री.

चंद्रकांत खैरे, 

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते मा. श्री. अंबादासजी दानवे, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, काँग्रेस तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते 

Post a Comment

0 Comments