*राजकीय क्षितिजावरचा चकाकता तारा निखळला*
औसा/प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावचे भाचे, ॲड शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू आणि मनमिळावू स्वभावाने राजकीय क्षेत्रात उत्तुंग यशाचे शिखर गाठणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदापासून देशाच्या केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली ॲड शिवराज पाटील हे लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष 1972 स*** पासुन हे राजकीय क्षितिजा वरील धवल क्रांतीचे नेते होते. लातूर जिल्ह्यातील हे नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये चारित्र्यसंपन्न निष्कलंक आणि काँग्रेस पक्षातील निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जाते आपल्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्याचे सतत त्यांची धडपड सुरू असायची
लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाल्यानंतर 19 70 मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले 1972 पासून महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती तसेच सभापती म्हणून त्यांनी उत्तुंग कामगिरी केली 1980 स*** झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातून लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी आणि पी व्ही नरसिंहराव तसेच सुप्रसिद्ध अर्थतज्ञ तथा माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचा पदभार सक्षमपणे सांभाळला 1980 पासून 2004 पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या वेगळा ठसा उमटविला होता त्यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख माझी मंत्री बसवराज पाटील यांच्यासारखे असंख्य नेतृत्व निर्माण केले होते
केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री वाणिज्य मंत्री केंद्रीय गृहमंत्री अशा विविध खात्यामध्ये त्यांनी आपले राज्यसभा सदस्य म्हणून वरिष्ठ सभागृहामध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली होती शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या हयातीत काँग्रेस पक्षाची अत्यंत निष्ठेने सेवा केल्यामुळे त्यांना महाराष्ट्रासह देशाच्या मंत्रिमंडळात विविध खात्यामध्ये आपला प्रभाव निर्माण करता आला
त्यांची अभ्यासू वृत्ती आणि पक्षावरील निष्ठा याची दखल घेऊन पंजाब आणि राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये योगदान असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नेतृत्व करीत असताना त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातीपाती विरहित राजकारण करीत आपला कार्यकर्त्यांचा समुदाय मिळविला होता .औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्रिंबकराव पाटील यांचे ते भाचे होते त्यामुळे औसा तालुक्यातील काँग्रेस पक्षातील सर्वच नेते मंडळी सोबत त्यांचे अत्यंत सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपले होते लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी काँग्रेस पक्षातून नेतृत्व करीत असताना त्यांनी भरीव योगदान दिले आहे जिल्ह्यातील शैक्षणिक औद्योगिक विकासाला चालना देत रेल्वे मार्ग आणि चाकूर येथील बीएसएफ चे प्रशिक्षण केंद्र त्यांच्या कार्याची साक्ष देतात आपल्या अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावामुळे ॲड शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पी यशाचे उत्तुंग शिखर गाठले पक्षावर असलेली आढळनिष्ठा नेत्यावर असणारी श्रद्धा आणि ज्ञानपीपासून वृत्तीमुळे राजकीय क्षितिजा वरचा चकाकणारा तारा १२ डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 91 वर्षी निखळला आणि राजकीय क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यात पुन्हा मोठी पोकळी निर्माण झाली असेच म्हणावे लागेल माझी गृहमंत्री स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ....
राम कांबळे औसा 90 21 36 67 55



0 Comments