*चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा*
सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. फहिम गोलीवाले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तर अध्यक्षस्थानी बशीर अहमद बागवान होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जे.बी. बागबान, डॉ. परवेजआलम अतनुरकर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, भाषणे व सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी सामुहिक कवायद सादर केले व असाक्षर मुक्त शाळेची शपथ घेतली तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभुषा परिधान केले होते. आपल्या भाषणात डॉ. फहिम गोलीवाले यांनी मातृभाषेतून शिक्षणाचा महत्व सांगितले तसेच तंबाखु व सिगरेट पासुन होणाऱ्या दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी प्रस्ताविकात संस्था व शाळेची माहिती दिली. सुत्रसंचालन खतिब उम्मे हबीबा यांनी तर आभार शेख शमीम यांनी मानले. कार्यकमला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले व यावेळी पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

0 Comments