मुस्लिम वेलफेअर असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त पाणी वाटप राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश..

 मुस्लिम वेलफेअर असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त पाणी वाटप राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश..





लातूर :दिनांक २० ऑक्टोंबर, २०२६ मंगळवार रोजी  

दसरा सणानिमित्त मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने   शाहू चौक येथे पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष सलीमजी सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक चळवळीतील एक भाग शिक्षण, संरक्षण, आरक्षण ,सह सामाजीक उपक्रम राष्ट्रीय ऐक्य धर्मनिरपेक्षता मानवी हक्क व समाजोपयोगी कार्याकडे मुस्लिम वेलफेअर असोसिएशनची वाटचाल असुन  महाराष्ट्र राज्य सचिव अली मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली  

दसऱ्याच्या निमित्त पाणी वाटप उपक्रम राबवण्यात आला 

दसरा हा सत्याचा असत्यावर विजय, प्रेम, सद्भावना आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे. या सणाचे औचित्य साधून मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागरिकांना पाणी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि परस्परांतील प्रेम व विश्वास वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी अब्दुल समद शेख, हाजी सलीम आळंद, अकबर शेख , इंजीनियर दायमी नसीर सर, खदिर मणियार, एजाज शेख यांच्यासह  असोसिएशनचे पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.

“सत्याचा विजय, प्रेमाचा संदेश आणि बंधुभावाचा संकल्प! सर्वधर्मसमभाव सदैव नांदो, हीच सदिच्छा!” असा संदेश देत उपस्थितांनी नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

समाजातील विविध धर्मांच्या नागरिकांमध्ये सलोखा, एकोपा आणि परस्पर आदराची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला. उपस्थितांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सामाजिक कार्य उपक्रमाने सामाजिक सलोखा निर्माण एकोपा  

हिच भारतीय संस्कृती होय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

Post a Comment

0 Comments