वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतन योजना जाचक अटी रद्द करून त्यांना तात्काळ सेवा निवृत्ती वेतन द्यायला हवे
औसा
पत्रकाराचे. जे आर्थिक प्रश्न आहेत विशेष करून त्यांच्या आर्थिक प्रश्नाची सोडू वणुक व्हायला हवी.
समाजाकडून पत्रकारांना अधून मधून. औषधांचा डोस लागत असतो ..त्याप्रमाणे नेतेमंडळी किंवा प्रसंगी अधिकारी मंडळी पत्रकारांना विविध औषधांचे डोस पाजत असतात .पत्रकार हे मुकाटपणे खाली माना घालून ऐकत असतात त्यांचाही म्हणजे आमचाही नाईलाज असतो . नेते
मंडळी अधिकारी यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. याबाबत आम्ही नकारार्थी नाही.पत्रकारांच्या प्रश्नाबाबत सांगायचे तर मागील सुमारे 30-35 वर्षापासून पत्रकारांचे प्रश्न सोडण्याचे प्रयत्न कसे होत आहेत त्याचा किस्सा मी या ठिकाणी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करत आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी औसा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यतत्पर आमदार मा.किशनरावजी जाधव कार्यरत होते त्यांच्या कालावधीत भूकंप काळात केंद्र आणि राज्य सरकार
आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध संस्थांसाठी तसेच स्वतंत्र इमारतींचे बांधकाम करण्यात आले .भूकंपग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. अशा त्या कालावधीत औसा येथील सुमारे पंधरा-वीसपत्रकारांना घरी निवासस्थान उपलब्ध करून देणे सदनिका बांधकाम करून देणे काहीच कठीण नव्हते. तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला आणि तत्कालीन आमदार आमदार किशनरावजी जाधव यांनी ते शिव धनुष्य उचलण्याची मान्य केले होते. औसा येथील हिंदुस्थानी एजुकेशन सोसायटीचे संस्थापक शिक्षण महर्षी पै. प्रा. नवाबुद्दीन साहेब शेख यांनी त्यासाठी काही जमीन स्वतः उपलब्ध करून देण्याचे वचन दिले होते. आम्हाला आज ही आठवते लातूर मोड परिसरात कुठेतरी तेव्हा जमीन पाहिली होती. निर्णय अंतिम टप्प्यात होता मात्र माशी कुठे शिंकली या ठिकाणी मी माशी शिंकली अशी मी म्हणणार नाही तर या ठिकाणी माशी जिंकली. असे म्हणणे विजय ठरेल असे म्हणणार नाही माशी जिंकली.कुणास माहित. प्रश्न मागे पडला तो पडलास.
मित्रहो सजन हो पत्रकारांना देण्यासाठी मन खूप मोठ्या असावे लागते.. एकतर बाब अशी असते ही पत्रकारांना कोणी असो त्याच्या दोन्ही बाजू चांगले अनुकूल प्रतिकूल लेखन करण्याचे आपले काम करावे लागते .त्यामुळे ही मंडळी वर प्रसंगी नाराज होतात. कायम खुश किंवा नाराज ठेवण्याचा पत्रकारांचा हेतू नसतो आणि नसायला हवा. पत्रकार यांनी सम दृष्टी ठेवून लेखनकाम करायला हवे. मित्रहो सजन हो या ठिकाणी आम्हाला स्पष्ट करत असताना दुःख होत आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटली तरी आपण देशातील राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना वयाची साठी वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना आर्थिक न्याय अद्यापि न्याय देऊ शकलो नाही. आपण आजही इंग्रजांच्या जाचक अटी चे काटेकोरपणे पालन करून अशा पत्रकारावर उघडपणे अन्याय करत आहोत. ज्यांनी वीस तीस वर्ष पत्रकारितेत काम केले. त्यांच्या आर्थिक विपणनावस्थेच्या काळात वृद्धापकाळ काळात आर्थिक न्याय देणे सरकारचे कर्तव्य आहे .मात्र हा प्रश्न आजही.जाणीवपूर्वक दृष्टी आड करून सरकार दुसऱ्याच प्रश्नावर त्यांची नेते मंडळी बोलत असतात. यामध्ये विरोधी सुद्धा आले. आम्हाला सतत राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांची आठवण येत असते. आज.ते हवे होते .त्यांच्या कालावधीत हा प्रश्न केव्हा सुटला असता. विद्यमान सरकारने त्यांच्यासारखे प्रशासकीय निर्णय क्षमता स्वीकारायला हवी. हा प्रश्न अद्यापही सुटला नाही. याची दुःख होत आहे. . राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री कर्तव्य तत्पर आमदार अमित विलासरावजी देशमुख. यांनीही या कामी.तात्काळ लक्ष घालावे. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस अर्थात देवा भाऊ .मुख्यमंत्री महोदयांचे स्वीय सहायक सचिव म्हणता येतील. कर्तव्य तत्पर आ.अभिमन्यू.भाऊ पवार.नवनिर्पवाचित आमदार. बसवराज जी.पाटील . डॉ. सौ.अर्चनाताई पाटील. आ. रमेश आप्पा कराड माजी मंत्री संजय बनसोडे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील.या सर्वांनी लक्ष घालायला हवे. देशाचे माजी गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी सभापती. स्व. शिवराजजी पाटील चाकूरकर . यांनी खादी ग्रामोद्योग कर्मचारी कामगारांना त्यांना वेतन किती आहे हे न पाहता त्यांना सेवानिवृत्ती वेतन मंजूर केले. त्याचा अभ्यास सर्व लोकप्रतिनिधी यांनी करायला काही हरकत नाही मात्र मनातून काम करण्याची इच्छा असायला हवी. विचार करा राज्याचे मुख्यमंत्री महोदय लोकप्रतिनिधी प्रतिनिधी महोदय त्यांच्याशी मागील सुमारे पाच वर्षापासून पत्रव्यवहार करत आहे .सकारात्मक ता अध्यापि दिसून येत नाही याचे दुःख होत आहे तीव्र तीव्र दुःख होत आहे.
जे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांच्यापैकी जण इतर नोकरी पेशा करतात. त्यांना समाधानकारक प्रतिम हा वेतन मिळत असेल नसेल .त्यांच्यासाठी अशी आर्थिक निवृत्तीवेतनाची आवश्यकता आहेच . .मात्र. ज्यांना अशी जोड नोकरी किंवा धंदा नाही त्यांच्यासाठी आजपर्यंत सरकारने काय केले काही मोजक्या पत्रकारांना किंवा निवृत्तीवेतन
आणि मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकार आर्थिक दृष्ट्या अन्याय होत असेल आजही होत आहे..तर अत्यंत दुःखद म्हणावे लागेल. पत्रकारितेमध्ये प्रामाणिक तेला इ तर कोणत्याही पर्याय नाही.आम्ही औसा येथील ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारिता अगदी प्रामाणिकपणे केली आज ही प्रयत्न.करत आहोत मात्र शासनाच्या लेखी कारकूनी पत्रकारिता अपेक्षित असेल असे आम्ही म्हणत नाही!मित्रहो !!
!सजन हो !!
!!पत्रकारीता म्हणजे कारकुनी नव्हे. पाट्या टाकण्यासारखे. आज आम्हाला काही जण विचारतात की पत्रकार होण्यासाठी किती खर्च येतो. त्याला आमची उत्तर अशी आहे की. आमच्या काळात अभ्यास करण्यासाठी पुस्तके घेण्यासाठी ग्रंथ वाचण्यासाठी खर्च येत असे. आज वेगळा खर्च येत असेल तर आम्हाला माहिती नाही. आम्ही खूप खूप वाचन लेखन केले अभ्यास केला आजही करत आहोत. . पत्रकारिता करण्यासाठी सरकारने काही आवश्यक नियमावली तयार करायला हवे. किमान पदवीधर. लेखन करण्याची क्षमता. मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषा अनुवाद करता आला पाहिजे. आम्ही ग्रामीण भागातील पत्रकार आहोत हे मान्य म्हणून आम्हाला त्यांनी बसायचे नॉलेज नाही असे म्हणता येणार नाही ते प्राप्त करावे लागेल अभ्यास करावा लागेल. या तिन्ही भाषा आपल्याला लेखन करता आले पाहिजे अनुवाद करता आला पाहिजे.
. पत्रकार म्हणजे कारकुनी नव्हे तर कुणावर आम्हाला टीका करावयाची नाही त्यांचीही काम आवश्यक आहे चांगले आहे. आम्ही कारकुन नाही. कामाचे स्वरूप वेगळे आहे. कधी मैदानात तर कधी कार्यालयात. थोडक्यात समाजसेवकाचे काम म्हणता येईल.
पत्रकार म्हणजे समाजसेवक पत्रकार म्हणजे स्वातंत्र्यसैनिक पत्रकार म्हणजे लोकशाही संरक्षक अगदी सोपी व्याख्या आहे. म्हणून मित्रहो !!सरकार किंवा नेते मंडळी आम्हाला वेळोवेळी औषधे डोस पाजत असतात! त्याविषयी आमच्या मनात येते किंचित हे राग नाही. सरकारला नेते मंडळींना आमचे एकच मागणी आहे की समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन विनाअट विना विलंब तात्काळ चालू करण्यात यावे. अशी औषधी डोस अधून मधून पाजत राहावे. काही जण असे म्हणतात की पत्रकार हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील नसतील ते काही असो सरकारने आपली कर्तव्य पार पाडायला हवी काही अगदी मोजके पत्रकार आर्थिक दृष्ट्या संपन्न गटातील काही मोजक्या पत्रकारांना समाधानकारक वेतन मिळत असेल नसेल. तर या उलट मोठ्या प्रमाणात पत्रकारांना वेतन मिळत नाही . त्यांची नोंद कारकुन पद्धतीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात नाही हे सत्य नाकरता येत नाही. ज्येष्ठ पत्रकारांचे आजार पण.अनुभव यांचे लेखन वय मर्यादा लक्षात घेऊन विनाअट त्यांना प्रतिमहा सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्यात यावे. कारकुनी प्रमाणे त्यांना प्रतिम हा वेतन मिळाले नाही म्हणून अशा ज्येष्ठ पत्रकारांचा जगण्याचा हक्क सरकारला हिरावून आहे.असे करता.येणारनाही. . वृद्धापकाळात औषध पाणी दवाखाना या गरजा त्यांनी कशा पूर्ण कराव्यात. सरकार विविध प्रश्नांवर बोलत असते या प्रश्नांची सोडूवणक करत आहे. .विद्यमान राज्य सरकार समाजातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मात्र वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकारांच्या य निवृत्तीवेतन योजना जाचक अटी रद्द करून त्यांना तात्काळ सेवा निवृत्ती वेतन द्यायला हवे. या प्रश्नाकडे सरकार नजरे आड करत आहे.आधुनिक लोकशाही राज्यपद्धतीमध्ये ज्येष्ठ पत्रकारांच्या हक्क सरकारने त्यांना तात्काळ मिळवून द्यायला हवा. केंद्रात राज्यात सरकारी आले आणि गेले. मात्र . ज्येष्ठ पत्रकारांच्या आर्थिक प्रश्नाकडे सोडवण्याची कोणालाही आवश्यकता वाटली नाही. वर अधोरेखित केल्याप्रमाणे जाचक अटी तात्काळ रद्द करून वयोवृत्त जेष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन योजना चालू करण्यात यावी. याबाबत प्रस्तुत मागील सुमारे पाच वर्षापासून राज्य सरकारकडे .पत्रव्यवहार करत आहे मात्र अद्यापही सरकारला जाग आली नाही याचे दुःख वाटत आहे !तुर्त एवढे पुरे !
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 1972 68.

0 Comments