अहमद सालार पटेल यांचे निधन
औसा :
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे, तसेच प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अहमद सालार पटेल यांचे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.ते 65 वर्षा चे होते त्यांच्या निधनाने औसा शहरातील सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहमद सालार पटेल हे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे, प्रेमळ वागणुकीमुळे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचे संबंध जपण्याच्या वृत्तीमुळे परिचित होते. समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, अडीअडचणीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे, तसेच प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही त्यांची विशेष ओळख होती. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांची मोठी हानी झाली असून सामाजिक क्षेत्रातही एक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र जाफर अहमद पटेल हे पत्रकार असून, मुजफ्फर अहमद पटेल, जाकेर अहमद पटेल, शाकेर अहमद पटेल आणि साबेर अहमद पटेल हे त्यांचे अन्य पुत्र आहेत.

0 Comments