जिथे गाव तिथे शाखा असावी आणि जिथे घर तेथे शिवसैनिक असावा- कैलास पाटील


 

जिथे गाव  तिथे शाखा असावी आणि जिथे घर तेथे शिवसैनिक असावा- कैलास पाटील


दि. 9 - उस्मानाबाद -

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा, सिंदफळ, काटगाव येथे जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांनी शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी ते बोलत होते.


नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविणे हा शिवसंपर्क अभियानाचा मुख्य उद्देश असून तो साध्य होत आहे. यासोबतच जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये समनव्यय साधण्याचा प्रयत्न शिवसंपर्क अभियानातून केला जात आहे. शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी गाव तिथे शाखा आणि 'घर तिथे शिवसैनिक' यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले.


याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे-पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, शहरप्रमुख सुधीर कदम, शाम मामा पवार, शिवअल्पसंख्याक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख, उस्मानाबादचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भीमा जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख मुळे, शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, शहराध्यक्ष सागर इंगळे, उपशहरप्रमुख बापू नाईकवाडी, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, अर्जुन साळुंखे, बाळासाहेब शिंदे, विभागप्रमुख बालाजी पांचाळ, उपसरपंच विनोद ठोंबरे, हणमंत जाधव, विशाल गायकवाड, दादा माळी, मनोज गायकवाड, सचिन एकंडे, शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य मनोज गायकवाड, दिनेश भोजने, गणेश धनके, बाळासाहेब डोंगरे, याकूब इनामदार, महेश नवगिरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments