इंजिनिअर,आर्किटेक्टसाठी मोफत लसीकरण कॅम्प संपन्न


 

इंजिनिअर,आर्किटेक्टसाठी मोफत लसीकरण कॅम्प संपन्न

लातूर / असोसिएशन ऑफ कन्सलटिंग इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस लातूरच्या वतीने जिल्ह्यातील इंजिनिअर, आर्किटेक्ट आणि त्यांच्या परिवारासाठी शनिवार ७ रोजी ऑफिसर्स क्लब शासकीय कॉलनी येथे मोफत लसीकरण कॅम्प घेण्यात आला यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी कोव्हिड १९ प्रतिबंधक लस हाच उपाय असल्याने देशभरासह लातूर जिल्ह्यातही प्रशासनाच्या वतीने मोठया प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविली जात असून या चळवळीचाच एक भाग म्हणून नेहमीच सामाजिक बांधिलकीची किनार जोपासणार्‍या असोसिएशन ऑफ कन्सलटिंग इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस जिल्हा लातूर व महानगरपालिका लातूरच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ७ ऑगस्ट रोजी ऑफिसर्स क्लब सभागृह शासकीय कॉलनी, बार्शी रोड या ठिकाणी असोसिएशनचे सदस्य व त्यांच्या परिवारासाठी मोफत लसीकरण कॅम्प घेण्यात आला. दिवसेंदिवस कोव्हीड १९ प्रतिबंधक लसीची होत असलेली मागणी पाहता या आयोजित लसीकरण कॅम्पमध्ये असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी सदस्यांना आवश्यकतेनुसार कोव्हीशिल्ड, कोवॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.याचा शंभराहून अधिक जणांनी लाभ घेतला.सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी असोसिएशन लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष अभिजीत देशपांडे सरसंबेकर यांच्यासह नितीन मंडाले, धर्मवीर भारती, वामन पाटील, अहमद मुल्ला, मनोज देशमुख,अरिहंत जंगमे, शाम संगमकर, वसीम शेख, विनोद उदगीरकर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments