भरत पिंगळे यांना सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान :
:पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते सत्कार
सांगली प्रतिनिधी कडेपूर गावचे सुपुत्र आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली. शाखा-शाळगावचे शाखाधिकारी भरत शंकर पिंगळे यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक-गुलाबराव पाटील प्रतिष्ठान सांगली मार्फत देण्यात येणारा सन २०२१-२०२२ साठीचा उत्कृष्ट जिल्हा बँक अधिकारी गटातील "सहकार तपस्वी गुलाबराव पाटील उत्कृष्ट जिल्हा बँक अधिकारी" या पुरस्कारासाठी भरत पिंगळे यांची निवड करण्यात आलेबद्दल सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराज (बाबा)देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भरत पिंगळे म्हणाले की, या विभागाचे माजी आमदार पृथ्वीराज
(बाबा) देशमुख यांनी माझ्या सारख्या गरीब कुटुंबातील एका मुलाला वीसवर्षापुर्वी बँकेत नोकरीस लावले आज हे येश मी त्यांच्या मुळेच मिळवू शकलो असे मला स्वतः ला वाटते. बँकेचे संचालक माननीय संग्राम भाऊंचे मार्गदर्शनाने बँकेच्या कामकाजात मोलाचे सहकार्य मिळत असते. त्यामुळे भाऊंच्या मार्गदर्शनखाली आजून चांगले कामकाज येथून पुढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अधिकराव पिंगळे, कडेगांवचे नवनिर्वाचित नगरसेवक विजय गायकवाड, किशोर मिसाळ आदी उपस्थित होत.
सदर पुरस्कार सोमवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बॅंकेचे मुख्य कार्यालय मधील माननीय वसंतदादा पाटील सभागृह येथे माननीय जयंत पाटील जलसंपदा व लाभक्षेत्र विकासातील विकास मंत्री महाराष्ट्र राज्य समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विश्वजीत कदम सहकार व कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देणार आहेत.
फोटो ओळ :कडेपूर येथे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील उत्कृष्ट जिल्हा बँक अधिकारी" या पुरस्कारासाठी भरत पिंगळे यांची निवड झालेबद्दल पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
0 Comments