राज्यात विद्यार्थ्यांना आता "समान संधी केंद्राच्या" वतीने मार्गदर्शन
· विकास व गुणवत्तावाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न
औरंगाबाद, दि.31, (विमाका) :- राज्यातील विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे. तसेच संवाद अभियान- युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांसाठी "समान संधी केंद्रे" - (Equal Opportunity Centre) स्थापन करण्याचे समाज कल्याण विभागाने ठरविले आहे, त्या संदर्भात मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग धनंजय मुंडे यांनी नुकतेच निर्देशीत केले आहे.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थीयांची मदत घेऊन महाविद्यालयातच "समान संधी केंद्रे" सुरू करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगारनिर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्यशासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपायोजना करण्याचे ठरवले आहे. सदर “समान संधी केंद्राच्या”माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याद्वारे करण्यात येणार आहेत.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले
0 Comments