पत्रकारितेत करिअर साठी अनेक संधी उपलब्ध
पत्रकारिता समाज उपयोगी झाली पाहिजे विकार शेख
▪️ सर्व वक्तत्यांचा एकच सूर ▪️
उर्दू भाषेला धर्माशी जोडणे गैर
- चिंचोळकर यांचे प्रतिपादन
🔸 ७ वां उर्दू अशरेचा शेवटचा उपक्रम
🔸 उर्दू न्यूज फ्री रिर्पोटींग स्पर्धा संपन्न
सोलापूर - पत्रकारिता या महत्त्वाच्या क्षेत्राकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो , पत्रकार क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या अनेक संधी सोलापूरात उपलब्ध आहेत . त्याचा फायदा घेत आपण यात करियर घडवावे असे आवाहन विकार शेख यांनी केले व पत्रकारिता समाज उपयोगी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले
यावेळी प्रमुख वक्ते व अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे मास कम्युनिकेशन व जर्नलीझम विभाग प्रमुख मा रविंद्र चिंचोळ्कर यांनी मार्गदर्शन करत म्हणाले
आपण ज्या पद्धतीने दुसर्या क्षेत्रात
जाण्याचा अथक प्रयत्न करतात त्या
जिद्दीने व आत्मविश्साने पत्रकारितेत उच्च शिक्षण घेऊन करिअर करावे या क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहे , जग आज तंत्रज्ञानात फार पुढे गेलेला आहे आपण ही आधुनिक पध्दीतीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे , आपल्या विद्यापीठासह आज अनेक ठिकाणी या शिक्षणाची संधी आहे , याचा लाभ सर्वानी घेत या क्षेत्रात विशेष परिश्रम , सतत वाचन , व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केले पाहिजे ते खादिमाने उर्दू फोरम व सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आयोजित '' क्या औन लाईन एज्युकेशन बच्चों के लिए फायदेमंद साबीत हो रहा है? " या विषयावर फ्री प्रेस रिर्पोटींग स्पर्धत बोलत होते
खादिमाने उर्दू फोरमच्या विविध कार्यक्रमाचे कौतुक करत श्री चिंचोळ्कर पुढे म्हणाले -
उर्दू ही गोड मधूर भाषा आहे परंतु आपल्या भारतात भाषेला धर्माशी जोडले जात आहे याची खंत वाटते
. भाषा ही मुग्लिमांचीच.आहे हे बोलणं कितीपत योग्य आहे ? असा ही प्रश्न उपस्थित केले .
उर्दू वृतपत्र हे मराठीपेक्षा जास्त वाचकप्रिय आहे स्वतंत्र्य मिळविण्यासाठी
उर्दू वृतत्रांचा फार मोठा योगदान आहे हे विसरता येत नांही
ते पुढे म्हणाले कि पत्रकारिता जबाबदारीने केले पाहिजे , आधुनिक पध्दतीचा अवलंब करीत पत्रकारिता योग्य पध्दीतीने व योग्य दिशेने केली पाहिजे
प्रारंभी रिजवाना बागबान यांनी कुराणपठण केले ,संयोजक अय्यूब नल्लामंदू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक करत पत्रकार क्षेत्राचे महत्व पटवून दिले आणि डॉ . चोबदार यांनी उर्दू फोरमच्या १० दिवसीय कार्यक्रमाचा आढावा वाचन केले तर प्रमुख पाहुणे मा रविंद्र चिंचोळकर, प्रा पी पी कुलकर्णी ,पत्रकार अन्वर शेख , अहमद शेख परिक्षक प्रशांत शिंगे , इलियास सिद्दीकी व विकार शेख यांचा सत्कार कार्यक्रमाचे संयोजक मजहर अल्लोळी, इक्बाल बागबान, व डॉ चोबदार , नासर आळंदकर , यांनी केले, या वेळी अन्वर कमिशनर, ,रफीक खान , अब्दूल मन्नान शेख, शफी कॅप्टन , आफताब नल्लामंदू उपस्थित होते ,
या स्पर्धत २५ विद्याथ्र्याचां सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखविले
या प्रसंगी पत्रकार आफताब शेख [ मुख्य वार्ताहर एबीपी माझा ] व अहमद शेख [ वार्ताहर झी -२४ ] यांनी सहभागी विद्यार्थ्याना डेमो दाखवत मार्गदर्शन करत म्हणाले -
प्रिंट मिडीया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीया असो आज दोन्ही ठिकाणी तरुण पिढीनीं या क्षेत्रात करियर करण्याकारिता उच्च शिक्षण घेऊन यावे जेणे करुन देशाच्या जडणी घडणी मध्ये त्यांचा चांगला सहभाग असावा, बीजे , एमजे करून या क्षेत्रात नोकरीचे अनेक संधी उपलब्ध्द असतात परंतु आमचा याकडे नेहमी दुर्लक्ष होत असतो. या क्षेत्रात भय असतो , परंतु डर के आगे जीत होती है , हे लक्षात घेतले पाहिजे
या नंतर इलेक्ट्रॉनिक मिडीयातील तांत्रिक माहिती देत व अनेक अनुभव सांगत विद्याथ्यांना मार्गदर्शन केले,
🔸 यांनी मिळविले पारितोषिक 🔸
या स्पर्धत सर सय्यद अहमद खाँ उर्दू ज्यु कॉलेजची टीम जहागीरदार सुमैय्या , आसीया शेख . मिस्बाह काझी , ला प्रथम क्रमांक , द्वितीय व तृतीय क्रमांक सोशल कॉलेजच्या मुजावर मिस्बाह अलीम व रिजवाना बागबान यांना , तर उत्तेजनार्थ एमःए पानगल चा हिदायत दलाल यांनी मिळविला
परिक्षक म्हणून इलियास सिद्दीकी , प्रशांत शिंगे यांनी काम पाहिले
कार्यक्रमाचे सुत्र संचलन जाफर बांगी यांनी केले तर मजहर अल्लोळी यांनी मानले
0 Comments