*उर्दू घरास, सर सय्यद अहेमद खान, उर्दू घर, असे नाव देण्याची भाजपा अल्पसंख्यांकची मागणी*

 *उर्दू घरास, सर सय्यद अहेमद खान, उर्दू घर, असे नाव देण्याची भाजपा अल्पसंख्यांकची मागणी*




सोलापूर- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय  समोरील जागेत अल्पसंख्यांक समाजाच्या हिताकरिता बांधण्यात आलेल्या उर्दू घर या भव्य इमारतीला शिक्षणाचे प्रसार व प्रचार करणारे  "अलीगढ मुस्लिम युनिवर्सीटीचे" सर्वेसर्वा, शिक्षणमहर्षी, सर सय्यद अहेमद खान, उर्दू घर असे नाव देण्यात यावे, असे निवेदन महसुल तहसिलदार श्री. दत्तात्रय मोहोळे यांच्याद्वारे जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आले.

या निवेदनात त्यांनी पुढे मागणी केली आहे की, उर्दू घरातील इमारतीमधील इतर इतर विभागांना वेगवेगळे नांवे देण्याची मागणी केली आहे त्यात हॉलला डॉ.अल्लामा इक़्बाल,  ॲडिटोरियम हॉलला शहिद टिपु सुल्तान, लॉयब्ररीला फातेमा शेख,  दोन वर्गाना खान अब्दुल गफ्फार खान व शहिद अश्फाक उल्लाह खान,  दोन सेमिनार हॉलना मौलाना अबुल कलाम आज़ाद व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नावे देण्यात यावे. हे सर्व थोर लोकानी  अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून त्यांनी उर्दू भाषेच्या विकासासाठी व देशाच्या स्वातंत्र्य, प्रगती, शिक्षण, शांती व बंधुभाव कायम ठेवण्याकरिता या सर्व  समाज सुधारक थोर व्यक्तीनी केलेले मोलाचे योगदान व कार्य कौतुकास्पद आहेत म्हणून यांचे नांवे देण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी अल्पसंख्यांक ज्येष्ठ नेते डॉ.रफिक सय्यद, मा.शहराध्यक्ष तथा भाजपा अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य कार्यकरणी ज़ाकिरहुसेन डोका ,शब्बीर शेख, अज़िज़ सय्यद, अब्रार शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments