*खासदार खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील यांचे निधन*
औरंगाबाद : 7 मार्च (प्रतिनिधी):- खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील यांचे शहरातील एक खासगी रूग्णालयात सोमवार 7 मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.
त्यांची नमाज ए जनाजा जामा मशीद येथे सोमवारी रात्री 11.00 वाजेच्या दरम्यान अदा करून दफनविधी मनपा समोरील हुजूर शहा दर्गा परिसरातील कब्रस्तानात पार पडेल.
श्रीमती जकीया जलील यांच्या पश्चात तीन मुले जफर जलील, खासदार इम्तियाज जलील आणि अहेमद जलील आहेत. तसेच चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या आपल्या निवसस्थाना जवळील परिसरातील लहान मुलांना अरबीचे शिक्षण देत असे व मनमिळाऊ म्हणून सर्वपरिचित होत्या.
0 Comments