सोशल उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

सोशल उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा







सोलापूर- सोलापूर सोशल असोसिएशन संचालित सोशल उर्दू हायस्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स व सोशल उर्दू प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अमजद सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजारोहक झाल्यानंतर प्रशालेतील मुलांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे झाली व त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला व टाळ्या वाजवून विद्यार्थ्याचे मनोबल उंचावले.
यावेळी प्रशालेतील लहान मुलांनी पंडीत जवाहरलामा नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री आदी महापुरुषांचे वेष धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी देशभक्तीपर गीतांवरती नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल, डॉ. अमजद सय्यद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमास सोशल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापिका शबनम सय्यद, प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल, उपमुख्याध्यापक इम्तीयाज शाब्दी, पर्यवेक्षक रसूल चौधरी, प्रा. अस्लम अचकल तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

(Iqbal Bagban)
Mob. No. 9552529277

Post a Comment

0 Comments