प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या भादेकर भूमिपुत्रांचे ग्रामस्थांकडून सत्कार.

 *प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या भादेकर भूमिपुत्रांचे ग्रामस्थांकडून सत्कार..*





बी.जी.शेख


औसा:तालुक्यातील नुकतीच प्रशासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या भादेकर भूमित्रांचे भादा ग्रामस्थांकडून हृदयपूर्वक फेटा,शाल,फुलांचा पुष्पहार,गोड पेढ्याचा घास भरवून पालकांसह भव्य असे स्वागत करण्यात आले.



औसा तालुक्यातील भादा येथील एम पी एस सी तून उवैस शब्बीर शेख कृषी अधिकारी गट ब पदी तर फेरोज अहमद पठाणची मुंबई पोलीस म्हणून नुकतीच निवड झालेली आहे.या निवडीबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या अपार,खडतर,आर्थिक अडचणीतून मार्ग काढत मेहनतीतून निर्माण झालेल्या या शासकीय सेवेच्या पदस्थापने करिता ग्रामस्थांकडून नुकताच जाहीर सन्मान रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.५० वाजता करण्यात आला. यावेळी त्यांच्या पालकांचाही शाल,हार देऊन सत्कार करण्यात आला.गावातील इतरही नवीन शालेय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामधून प्रेरणा मिळावी आणि स्वतःचेही भविष्य घडविण्याची संधी त्यांनी स्वतः मेहनत घेऊन कठीण परिश्रम करून प्राप्त करावी आणि मेहनतीतून निर्माण झालेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रेरणा सदैव मेहनती तरुणांना प्रेरणादायी ठरण्याकरिता हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम भादा येथील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये घेण्यात आला.

याचे प्रास्ताविक बी. जी.शेख यांनी केले तर प्रासंगिक पर मार्गदर्शन राम पाटील यांनी केले..यावेळी शिक्षण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते, भादेकर ग्रामस्थ,ग्राम पंचायत सदस्य अमोल पाटील,सूर्यकांत उबाळे,योगेश लटूरे, मि.जि. प. सदस्य पद्माकर चिंचोलकर, उपसरपंच बी एम शिंदे, प.स. किशोर जवांजाळे, बाबुराव आगलावे सह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments