ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच उपसरपंच चेअरमन,व्हा.चेअरमन संचालक यांचा भव्य काॅग्रेस कमिटी औसा तर्फे सत्कार *माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सोहळा*

 *ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच उपसरपंच चेअरमन,व्हा.चेअरमन संचालक यांचा भव्य काॅग्रेस कमिटी औसा तर्फे सत्कार



*माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सोहळा*









औसा प्रतिनीधी


औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच ,उपसरपंच, सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ,व्हा.चेअरमन,संचालक  यांचा भव्य सत्कार सोहळा  रविवारी दि 5/2/2023 रोजी सायंकाळी 4वाजता मुक्तेश्वर विद्यालय क्रिंडागण येथे औशांचे भुमिपुत्र तथा लातुर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या संकल्पनेतून औसा काॅग्रेस कमिटीच्या  वतीने औसा विधानसभा मतदार संघातील नूतन सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक यांचा राज्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख साहेब यांच्या हस्ते हल्लापा कोकणे माजी कृषी सभापती यांच्या उपस्थितीत भव्य असा सत्कार करण्यात येणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेणा साखर कारखान्यांचे चेअरमन सर्जेराव मोरे,जिल्हा बॅकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे,समद पटेल,शेषेराव पाटील,नारायण लोखंडे, रामदास चव्हाण,अमर खानापुरे,बस्वराज धाराशिवे,मौलाना करीमुल्लाह.अ अजिज सय्यद आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व तालुक्यातील पदाधिकारी,सर्व कमिटीचे अध्यक्ष सदस्य, कार्यकर्ते,लोकनियुक्त सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक व नागरिक यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन औशाचे भुमिपुत्र जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मांजरा कारखान्यांचे  व्हा चेअरमन श्रीशैल्य उटगे,औसातालुकाध्यक्ष  दत्तोपंत सुर्यवंशी,शहराध्यक्ष शकिल शेख,यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments