पीर मगजवाडी येथून म्हशीची चोरी

 पीर मगजवाडी येथून म्हशीची चोरी





औसा : औसा तालुक्यातील पीर मगजवाडी शेतशिवारात सर्वे नं. २ येथे दावणीला बांधलेली मुरा जातीची म्हैस अज्ञात चोरट्याने ५ फेब्रुवारी रोजी पळविली. याप्रकरणी फिर्यादी नईमोद्दीन हबीबोद्दीन पटेल (रा. शाही मोहल्ला ता. औसा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध कलम भा द स 1860 नुसार 379 नुसार औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना. डिग्गे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments