डॉ. वसीउल्लाह अब्बास मक्की यांच्या उपस्थित* *आज 'पयाम-ए-तालीम' शैक्षणिक कॉन्फ्रेंस

 *डॉ. वसीउल्लाह अब्बास मक्की यांच्या उपस्थित*

*आज 'पयाम-ए-तालीम' शैक्षणिक कॉन्फ्रेंस*






सोलापूर- सोलापूर जिलई जमियत अहले हदिसच्यावतीने होटगी रोडवरील साखर कारखाना ते कुंभारी रोडचा मध्ये सलफिया कॅम्पस येथे  आज शनिवार दि. ०४ मार्च २०२३ दु. ४ ते रात्रि १० वा. पर्यंत पयाम-ए-तालीम या नावाने कॉन्फ्रेंस आयोजित केली आहे. या कॉन्फ्रेंसमध्ये शैक्षणिक संकुल नोबल विसडम इंग्लिश स्कूल व जामियाचा पायाभरणी कार्यक्रम शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे सौदी अरेबिया मक्का येथील शिक्षण तज्ञ मुहद्दिस मुदर्रिस मुफ्ती मस्जिद ए हरम अल्लामा डॉक्टर वसीउल्लाह अब्बास मक्की यांच्या हस्ते होणार आहे.

या कॉन्फ्रेंसमध्ये अरशद मुखतार मुहम्मदी, अनिस उर रहेमान आजमी मदनी, अश्फाक सलफी मदनी, अब्दुल गफुर जामई, जैद पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रारंभी नर्सरी ते बारावीपर्यंत तसेच अरबीचे ही शिक्षण येथे दिले जाईल. त्यासाठी तज्ञ शिक्षक नियुक्त केले जाणार आहे. मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यासाठी मुस्लिम समाजातील मुला मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचा विकास करण्याचा जमियत चा संकल्प आहे, तरी या कॉन्फ्रेंसला सर्वांनी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जमियतचे अध्यक्ष मुख्तार अहमद हुमनाबादकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments