चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिवस व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
.
फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला तसेच यावेळी शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाले. शिक्षण विस्तार अधिकारी दौलत बेगम नदाफ यांच्या शुभहस्ते शाळेत घेण्यात आलेले विविध स्पर्ध मध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जे. बी बागबान तर प्रमुख पाहुणे म्हणुन बशीर अहमद बागबान उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी शाळा व संस्थेची माहिती दिली. सुत्रसंचालन बागवान नेहा यांनी तर यांनी आभार चौधरी यास्मीन यांनी मानले .
0 Comments