बनावट शिपाईला अभय देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा! शिपाई पदमुक्त तर सरपंच अपात्र व ग्रामसेवक निलंबित होणार? अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने उपोषणाचा दिला इशारा.

 बनावट शिपाईला अभय देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा!

शिपाई पदमुक्त तर सरपंच अपात्र व ग्रामसेवक निलंबित होणार?

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने उपोषणाचा दिला इशारा.






औसा (प्रतिनिधी-शिवाजी मोरे)लातूर जिल्ह्यातील शिवणी (बु) ग्रामपंचायत मध्ये बनावट शिपाई विजय खराडे यांची नियुक्ती करताना ग्रामपंचायत कार्यालय शिवणी (बु) ता.औसा जि.लातूर ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीचे पालन न करता बनावट नियुक्ती केल्याचे चौकशी अंतिम सिद्ध झाले आहे याबाबतीत सरपंच श्रीमती शोभा धोंडीराम जाधव व निरुडे एस.व्ही. ग्रामसेवक हे जबाबदार आहेत असे चौकशी अंतिम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी लेखी आदेश पारित केले त्या आदेशाचा पालन करून शिवणी (बु.) सरपंच व ग्रामसेवक व शिपाई यांच्याविरुद्ध पोलीस मार्फत गुन्हा नोंद करणे व ग्रामसेवक यांना निलंबित करणे खोटी नियुक्तीचा विजय खराडे यांना सेवेतून बडतर्फ करून घेतलेली पगार व्याजासह वसूल करावे असे अर्ज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी, औसा तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे, पत्रकार वामन अंकुश, तानाजी भंडे, कासीम, इम्रान जमीनदार यांनी पुराव्यासह गट विकास अधिकारी यांना ईमेलद्वारे व प्रतेक्ष भेटून अर्ज करूनही सदर प्रकरणात गटविकास अधिकारी यांनी आरोपीशी संगणमत करून व मोठी आर्थिक देवाण-घेवाण करून स्वतःच्या फायद्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून आदेशाचे पालन केले नाही त्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन खोटी नियुत्ती धारक शिपाई विजय खराडे व सरपंच शोभा जाधव व ग्रामसेवक निरुडे एस.व्ही. यांच्याविरुद्ध पोलिसामार्फत गुन्हा नोंद करुन खराडे यांची सेवा समाप्त करुन आज पर्यंत घेतलेली पगार व्याजासह वसूल करावे व ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करावे व सरपंच पदावरून अपात्र करावे व सदर प्रकरणात आरोपींना अभय देणाऱ्या निष्क्रिय गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावे अशी तक्रार दि.10/4/2023 रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी, प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड, औरंगाबाद जिल्हा सचिव फिरोज पठाण, तानाजी भंडे, व्यंकट कदम, कासिम जमीनदार यांनी तक्रार देऊन  2 मे 2023 पासून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत आमरण उपोषण करणार असे निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments