औसा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान
औसा प्रतिनिधी
औसा शहर व तालुक्याला दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रचंड मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, हरभरा,करडी,गहु या पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील वादळी वाऱ्यामुळे कडबा उडून गेला आहे. तर काढून ठेवलेल्या पिकाचे ढिगारे उडून गेल्यामुळे ही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि फळबागा उत्पादक शेतकऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला. सायंकाळी औसा शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे तहसील कार्यालयासमोर असलेल्या विद्युत डीपी मध्ये स्फोट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. औसा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक सुरू असताना सुमारे एक तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जयंती समितीच्या कार्यकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.
0 Comments