डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज बेलकुंड येथे विविध कार्यक्रम
औसा प्रतिनिधी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती सोहळ्यानिमित्त हिंदू खाटीक समाज संघटना व साप्ताहिक लातूर परिवाराच्या वतीने आज दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साप्ताहिक लातूर दर्शन विशेषांकाचा भव्य प्रकाशन सोहळा तसेच हिंदू खाटीक समाजातील पाल्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या पालकांचा सत्कार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात दि रिंगण लाईव्ह चॅनलचे निर्माते राजू पाटील यांचे व्याख्यान होणार आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे अखिल भारतीय छ*** संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे विजयकुमार घाडगे पाटील सम्राट युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे आणि सरपंच विष्णू कोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास आणि आंबेडकर प्रेमी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक विलास नामदेव तपासे कार्यकारी संपादक साप्ताहिक लातूर दर्शन यांनी केले आहे

0 Comments