औसा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा
वीज पडून ५५ वर्षीय शेतकरी मृत्युमुखी
आसिफ पटेल
औसा : मागील दोन दिवसापासून औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून प्रचंड मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन औसा तालुक्यामध्ये जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अवकाळी पावसाचा तालुक्याला तडाखा बसला आहे. दिनांक २७ एप्रिल रोजी भंगेवाडी येथील बब्रुवान कंदगुळे या शेतकऱ्याची बैलजोडी व गाय ही तीन जनावरे वीज पडून ठार झाली. ही घटना ताजी असतानाच शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील शौकत इस्माईल सय्यद वय ५५ वर्ष या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला तसेच यावेळी वीज चमकल्यामुळे काही जनास दृष्टीदोष निर्माण झाल्याचेही वृत्त हाती आले आहे. हवामान खात्याने दोन मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने तालुक्यातील शेतकरी जनतेत घबराट पसरली आहे. शेतकऱ्यांचे पशुधन शेतामध्ये असल्यामुळे व शेतावर पेरणीपूर्व मशागतीची तसेच उशिरा पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाच्या कापणीची कामे सुरू आहेत. तसेच साखर कारखाने सुरू असल्यामुळे ऊसतोड आहे.
कामगारांची कामे शेतात सुरू आहेत. मेंढपाळ वर्गही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाला ठोकून आपल्या कळपासह शेतावर राहत असल्याने पशुधनाचे व पशुपालकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून पडलेल्या वादळी वाऱ्याच्या आणि पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्याच्या शेतातील विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडली आहेत. भाजीपाला उत्पादक व फळबागा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. द्राक्ष बागाचे मोठी हानी झाली असून आंबा या फळ पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी औसा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे जीवित आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी, नागरीक त्रस्त झाली

0 Comments