काव्यातून आत्मिक आनंदाची प्राप्तीःकवी संजय घाडगे

 काव्यातून आत्मिक आनंदाची प्राप्तीःकवी संजय घाडगे






  औसा,दि.३१ःकाव्य हा साहित्याचा एक प्रकार असून, काव्यातून आपल्याला आत्मिक आनंदाची प्राप्ती होते असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी संजय घाडगे यांनी केले.

औसा येथील आझाद महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ १४ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान हस्ताक्षर,निबंध, वक्तृत्व आदिंसह विविध म्हणीचे संकलन करण्यात आले. या समारोपाला कवी आपल्या भेटीला’हा बहारदार कवितेचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी कवी घाडगे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.ई.यू.मासुमदार हे उपस्थित होते.

यावेळी कवी संजय घाडगे यांनी आपल्या लयदार, गोड आवाजात, रसाळ वाणीने’माय’,’सये ’,’सये तुझ्या डोळयामंदी’,’हुंदके’या गेय कवितांनी काव्यरसिकांच्या अंतःकरणाला हात घालत मने जिंकली. सये तुझ्या डोळ्यांमंधी माझं गाव गं काळजावर गोंदलेलं तुझं नाव गं ’माय’ कवितेद्वारे

काट्यावरती पाय तिचे ती कोण म्हणावी,दिसेल नऊवारीत बाई ती आई म्हणावी.

 ह्या कवितेतून आईची महानता सांगितली. काही विनोदी किस्से सांगत मराठी भाषा जपणे व वाढविणे तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयांचे आद्य कर्तव्य आहे असे ते म्हणाले. शेवटी ’हुंदके’ही गझल सादर करताना निःशब्द आसवांना ढाळून काल आलो, हुंदके उरात माझ्या जाळून काल आलो,या गझलेने शेवट केला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.ई.यू.मासुमदार यांनी मराठी भाषा व साहित्याला फार मोठी परंपरा आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी तिचा वापर वाढवला पाहिजे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दुष्यंत शिंदे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ.बिभीषण कांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रोहिणी डोंगरे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पटेल खैरात यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि काव्यप्रेमी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments